(फोटो)
पुसद : ओबीसीचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी सभागृहात लढणाऱ्या १२ आमदारांचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे, या मागणीकरिता भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने येथे काळी फित लावून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द करण्यात आले. ओबीसी समाजाला त्यांचे हक्काचे रद्द झालेले ओबीसीचे आरक्षण सरकारने परत मिळवून देण्यासाठी सभागृहात सरकारने आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीकरिता सोमवारी विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांनी हा विषय लावून धरला. मात्र, आघाडी सरकारच्या विधानसभा तालिका अध्यक्षांनी या आमदारांना एक वर्षाकरिता निलंबित केले. त्यामुळे आघाडी सरकारचे ओबीसी विरोधी धोरण पुन्हा उघडे पडले.
याप्रसंगी ओबीसी मोर्चाच्या महिला जिल्हा अध्यक्षा डॉ. रुपालीताई जयस्वाल, जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शेखर वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष लक्षणराव आगाशे, जिल्हा उपाध्यक्षा रेश्माताई शिंदे, शहर अध्यक्ष संतोष चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.