यवतमाळ : बँकेचे खासगीकरण थांबवावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचे पडसाद यवतमाळातही पाहायला मिळाले. सोमवारी येथे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेतील इंदिरा गांधी मार्केट शाखेसमोर धरणे व निदर्शने केली. आधीच तीन दिवस बँका बंद होत्या. त्यात आता पुन्हा दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. व्यापारी, व्यावसायिक व सामान्य नागरिकांच्या व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो आहे. या संपात राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले.