लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना काळातील थकीत वीज बिलाची वसुली करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत . त्यामुळे सवलतीच्या आशेवर असलेल्या वीज ग्राहकांना जोरदार शॉक लागला आहे . कोरोना काळात वीज ग्राहकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलातून सवलत मिळण्याची शक्यता मावळली आहे . महावितरणने त्याबाबतचा परिपत्रकाचा जारी केले आहे .याचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र वीज बिल ग्राहक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी येथे महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करीत राज्य सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी केली .
यावेळी कोरोना काळातील वीज बिले सरसकट माफ करण्याची मागणीही करण्यात आली . सरसकट वीज माफी देणे शक्य नसल्यास शासकीय आणि निमशासकीय कर्मच्यार्याना वगळून बाकीच्यांना वीज माफी द्यावी अशीही मागणी यावेळी केली. वीज बीला माफ झाले नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .