शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा

By admin | Published: March 17, 2017 2:44 AM

शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली.

संजय राठोड : दारव्हा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ दारव्हा : शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली. तरीसुद्धा पाण्याची समस्या कायम आहे. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर मात्र सर्व नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सूचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेला दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत दारव्हा शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी ३४ लाख रुपये मंजूर झाले. या योजनेच्या कामाचा शुभारंभ संजय राठोड यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विकास कामांकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु कामाचा दर्जा व तांत्रिक बाजू योग्य नसल्यास नागरिकांना त्याचा पाहिजे तसा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेचे तसे होता कामा नये, असे ते म्हणाले. पाणीपुरवठा योजनेसोबतच शहर स्वच्छता, भुयारी गटार, खुल्या जागांचा विकास, रस्ते बांधकाम, पथदिवे आदी कामांसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, आवश्यक तो निधी मिळवून देवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपाध्यक्ष प्रीती बलखंडे, सभापती आरिफ काजी, प्रकाश दुधे, वैशाली खाटिक, गजेंद्र चव्हाण, रवी तरटे, नगरसेवक प्रकाश गोकुळे, अरविंद निंबर्ते, दीपा सिंगी, सीमा चिरडे, शरद गुल्हाने, जयश्री खरोडे, मीरा कराळे, सुनीता ठाकरे, शुभम गवई, जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, राधा थरकडे, अश्विनी कुरसिंगे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, सदस्य नामदेव जाधव, साहेबराव कराळे, सुनीता राऊत, सिंधुताई राठोड, सविता जाधव, शारदा दुधे, शारदा मडावी आदी उपस्थित होते. संचालन पोटदुखे, प्रास्ताविक मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी केले. आभार पाणीपुरवठा विभाग प्रमुख हिरासिंग राठोड यांनी मानले. जीवन प्राधिकरण, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार नागरगोजे, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)