लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध प्रकारचा कचरा आरोग्यास कसा हानीकारक आहे आणि तो नष्ट करणे किती गरजेचे आहे, याविषयीची जनजागृती रॅली यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे काढण्यात आली. ‘डिझायर फॉर चेंज’ या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी दर्डानगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेप्रती जागरूकतेचे आवाहन केले.‘डिझायर फॉर चेंज’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. समाजाच्या कल्याणाच्यादृष्टीने कार्य करणाºया या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम राबविले जाते. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ पब्लिक स्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारात स्वच्छता मोहिमेचा प्रचार व प्रसार उपक्रम राबविला गेला. यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहामध्ये विनित लाठीवाला, दिवा माकेसना, कशीश जेसवानी, राशी अग्रवाल, नील बुटले, अमन तिवारी, श्रृती भेंडारकर, नम्रता नार्लावार यांचा समावेश होता.दोन समूहातील विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा कसा करावा, तो नष्ट कसा करता येतो याविषयी माहिती दिली. सोबतच अस्वच्छतेच्या परिणामाविषयी जागरूक करण्यात आले.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना दिनेश जयस्वाल, उमाकांत रोडे, साक्षी नागवानी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले.
‘वायपीएस’चा जनजागृती उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:36 PM
विविध प्रकारचा कचरा आरोग्यास कसा हानीकारक आहे आणि तो नष्ट करणे किती गरजेचे आहे, ....
ठळक मुद्दे जनजागृती रॅली