शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘आदर्श ग्रामसभा’चे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:06 PM

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली.

ठळक मुद्देसरपंचांचा गौरव : ‘लोकमत’तर्फे ग्रामविकासाकरिता पुढाकार, दिमाखदार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली. बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या हस्ते या पुस्तिकेचे थाटात प्रकाशन झाले.‘लोकमत सरपंच अवार्ड’ वितरणाचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील हॉटेल स्टेप इनमध्ये पार पडला. यावेळी जिल्हाभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ‘आदर्श ग्रामसभा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. खासदार भावना गवळी, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञाताई भूमकाळे, यशदाचे मानद व्याख्याता नवनाथ गायकवाड, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.ग्रामसभेचे महत्त्व काय आहे, त्यात गावकऱ्यांचे अधिकार कोणते आहेत, ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना कोणत्या, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिवांची कर्तव्ये कोणती आहेत, यासंबंधीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तिकेत संकलीत करण्यात आली आहे. नियोजनबद्ध आणि गतिमान ग्रामविकासाकरिता या पुस्तिकेचा प्रत्येकाला उपयोग होईल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

टॅग्स :sarpanchसरपंच