शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

पुसदच्या कुस्तीत हिंगोलीचा गजानन भोयर अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 9:22 PM

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून शहरात दरवर्षी १ जानेवारीला कुस्त्यांची दंगल भरविली जाते. यावर्षी अंतिम लढतीत हिंगोलीचा पहेलवान गजानन भोयर याने सुनील शेवतकर याला लोळवून अजिंक्यपद प्राप्त करून चांदीची गदा पटकाविली.

ठळक मुद्देदंगल रंगली : देशभरातील शेकडो मल्लांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून शहरात दरवर्षी १ जानेवारीला कुस्त्यांची दंगल भरविली जाते. यावर्षी अंतिम लढतीत हिंगोलीचा पहेलवान गजानन भोयर याने सुनील शेवतकर याला लोळवून अजिंक्यपद प्राप्त करून चांदीची गदा पटकाविली.येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फेकुस्त्यांची दंगल भरविण्यात आली. दंगलीचा शुभारंभ पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी हनुमानाची पूजा व श्रीफळ अर्पण करून केला. यावेळी नगरसेवक निशांत बयास, इंद्रनील नाईक, परमेश्वर जयस्वाल, वैभव फुके, डॉ.शैलेंद्र नवथळे, यशवंत चौधरी, अमोल व्हडगिरे, शेख कयुम आदी उपस्थित होते.विदर्भ केसरी मंगेश करण, उपविदर्भ केसरी गणेश भिसे, किशोर पाणपट्टे, विशाल कांबळे, संजय दिंडे, राजाराम काळे, सतीश कानडे, खेमानंद मेहता, अशोक बनचरे, विष्णू गुद्धटवार, अभिमन्यू शिंदे, दत्ता बेरगड यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. धनाजी मदने, अमोल साखरे यांनी समालोचन केले. अंतिम लढतीत गजानन भोयरने सुनीलला पराभूत करून चांदीची गदा पटकाविली. शरद मैंद, मनीष शहा, इंद्रनील नाईक, सुधीर राठोड, सकीब शहा, राजू साळुंके, अमन खान, अमित बोरले, भीमराव कोळपे, संजय दिंडे, बिपीन चिदरवार, निशांत बयास, विलास काळे, विकास जामकर, सज्जन आडे, विनोद राठोड, दिनेश ठाकूर, समीर गवळी, बबन पांढरे, गजानन रेवणवार, आनंद मस्के आदींनी विजेत्यास चांदीची गदा, सन्मानपत्र, विजयी ट्रॉफी देऊन गौरविले.महिमा, तेजस्वीनीने वेधले लक्षपुरुषांचा मर्दानी खेळ असलेल्या कुस्तीत आता महिलाही मागे नाही. त्याची प्रचिती तालुक्यातील फुलवाडीची महिमा राठोड व अमरावतीची तेजस्वीनी यांनी दिली. महिमा राठोड व परवेझ खान यांच्या कुस्तीचा जोड शरद मैंद, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, अ‍ॅड.सचिन नाईक यांनी लावला. त्यात महिमाने परवेझला लाल मातीत लोळवीत बाजी मारली. शरद मैंद व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी तिला १५ हजारांचे व्यक्तीगत बक्षीस दिले.