शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पुसद दरोड्यातील पंडित गजाआड

By admin | Published: May 26, 2017 1:08 AM

येथील शासकीय कंत्राटदाराच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा प्रकरणातील पसार आरोपी पंडित मिश्रा याला पुसद पोलिसांनी

दोन वर्षांपासून गुंगारा : बंदुकीच्या धाकावर ऐवज लुटल्याचे प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शासकीय कंत्राटदाराच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा प्रकरणातील पसार आरोपी पंडित मिश्रा याला पुसद पोलिसांनी मोठ्या शिताफीने दिग्रस-दारव्हा मार्गावर बुधवारी रात्री अटक केली. तो पोलिसांना गुंगारा देत दोन वर्षांपासून पसार होता. पुसद येथील रामनगरातील शासकीय कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. पाच ते सहा दरोडेखोरांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून दहा लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच चिद्दरवार कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली होती. या दरोड्याच्या तपासात पोलिसांना पंडित मिश्रा हा मास्टर मार्इंड असल्याचे पुढे आले. पंडितच्या गँगने यापूर्वीच यवतमाळ आणि दारव्हा येथे दरोडा टाकला होता. परंतु तो दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत पसार होता. मध्यंतरीच्या काळात न्यायालयातून जामीनही मिळाला होता. त्याचा जामीन रद्द व्हावा, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. अखेर दारव्हा न्यायालयाने पंडित मिश्राची जामीन रद्द केली. तो पसार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार वाघु खिल्लारे यांनी दारव्हा व दिग्रस पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली असता दारव्हा येथून दिग्रसकडे येताना दुचाकीस्वार पंडित मिश्राला अटक केली. त्याच्याकडून किती मुद्देमाल जप्त केला जातो, याकडे लक्ष आहे.