सतीश येटरे - यवतमाळ शहरात नवीन कोण वास्तव्यास आला आहे. कुठे आश्रय घेतला आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तर नाही, अशा एक ना अनेक व्यक्तींची माहिती पुणे पोलिसांकडे आहे. त्यामुळे तेथे गुन्हेगारीला चाप बसला. याच धर्तीवर हा प्रयोग यवतमाळात राबविल्यास चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा बसू शकतो. एका रात्री २० चोऱ्या होत असताना पोलीस मात्र पारंपरिक तपास पध्दतीच वापरतात.उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी शहरात येत आहे. महाविद्यालयापासून जवळ असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये वास्तव्याला आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लोंढे शहरात दाखल झाले आहे. येथील दारव्हा मार्गावरील एकवीरानगरी, जसराणा अपार्टमेंट, रॉयल हेरीटेज, रॉयल पॅलेस अपार्टमेंट, महावीर नगर भाग १ व २, दर्डानगर, संभाजीनगर, कोल्हे ले-आउट आदीसह शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राहतात. घरातून मोजकेच पैसे मिळत असल्याने त्यांना मौजमजा करता येत नाही. त्यातूनच काही जण गुन्हेगारीकडे वळतात. ही बाब सर्वप्रथम पुणे पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी यवतमाळच्या चार विद्यार्थ्यांना गोपनीय माहितीवरून अटक केली. पैशासाठी तब्बल १३७ लॅपटॉप चोरल्याचे उघड झाले. त्यानंतरही अशा काही घटना घडल्याने आता तेथील पोलिसांनी नागरिकांना काही बाबी सक्तीच्या केल्या आहेत. फ्लॅट, घर आणि खोल्या भाड्याने देताना विद्यार्थी, बेरोजगार आणि तरूणांचे छायाचित्र घ्या. नाव, मूळ गाव, कशासाठी पुण्यात आले आदी माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागते.
पुणे पॅटर्नच बसवू शकतो गुन्हेगारीला चाप
By admin | Published: June 11, 2014 11:36 PM