लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : चंद्रपूर जिल्ह्यातील युग मेश्राम या चिमुरड्याच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हा अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी व दिग्रस सेवा फाऊंडेशनने केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील युग मेश्राम या दोन वर्षीय चिमुरड्याचा गुप्तधनासाठी नरबळी देण्यात आला. ही घटना २२ आॅगस्टला उघडकीस आली. चिमुरड्याची हत्या करणे ही अमानवीय आणि दुर्दैवी घटना असून अंधश्रद्धेला बळी पडून आतापर्यंत अनेक चिमुरड्यांचे बळी गेले आहे. मात्र अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे युग मेश्राम याच्या हत्याकांडाची सखोल चौकशी करून आरोपींना जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अटक करावी, सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्यक कमिटी व दिग्रस सेवा फाऊंडेशनने केली आहे.युग मेश्राम हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी फाशीची शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणीही तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अरबाज धारीवाला, सचिव अफजल खान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर जाधव, फैयाज मलनस, फैसल पटेल, कैलास चव्हाण,पवन जाधव, शेख इस्माईल शेख बशीर, सुनील वानखडे, पी.पी. पप्पूवाले यांच्यासह शेकडो दिग्रसकर उपस्थित होते.
युगच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 10:32 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील युग मेश्राम या चिमुरड्याच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हा अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी व दिग्रस सेवा फाऊंडेशनने केली आहे.
ठळक मुद्देदिग्रसवासीयांची मागणी : विविध संघटनांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन