लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या २ मेपासून नाफेडने पुसदला तूर खरेदी सुरू केली. ७ मेपर्यंत दोन हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. १५ मेपर्यंत नाफेड तूर खरेदी करणार होते. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत १० हजार ३८८ क्विंटल एवढीच तूर खरेदी करण्यात आली. नाफेडकडे एक हजार ६६९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९४१ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. दररोज सरासरी ३२० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. आता शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष व सचिव यांच्यात आपसी वाद झाला. या वादात नाफेडने १० मेपासून अचानक तूर खरेदी बंद केली.तालुक्यातील ७२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अद्याप बाकी आहे. बहुसंख्य शेतकºयांची तूर अद्यापही घरीच शिल्लक असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत पाच हजार ५० रुपये प्रति क्विंटल दराने बाजार समितीच्या मार्केट यार्डात तूर खरेदी सुरु होती. व्यापाऱ्यांकडे साडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्याकरिता पसंती दिली. मात्र नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू होती. त्यात प्रशासकीय यंत्रणेची अचानक खोडी आली व खरेदी बंद झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरळीत सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी प्रशासकीय यंत्रणेच्या हेकेखोर वृत्तीमुळे गुरूवार, १० मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकरी संतापले आहे. तसेही १५ मेपासून नाफेडची तूर खरेदी बंद होणार होती. मात्र पाच दिवस शिल्लक असतानााच खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील ७२८ तूर उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.आमदारांनी पुढाकार घेण्याची गरजआमदार मनोहरराव नाईक यांनी स्वत: पुढाकार घेऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय क्षेत्रातील आपसी वाद मिटविण्यासाठी आमदार नाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.
पुसदमध्ये तूर खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:39 PM
खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देप्रशासकीय वाद : अचानक निर्णय, शेतकऱ्यांना न्याय देणार कोण ?