(फोटो)
पुसद : विधानसभेत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वात येथे तीव्र निषेध नोंदवित तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
सोमवारी विधानसभेत भाजप आमदारांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये घुसून शिवीगाळ केल्याचा आरोप या आमदारांवर करण्यात आला. त्यावरून एक वर्षाकरिता निलंबन करण्यात आले.
परंतु विधानसभेत भाजपचे संख्याबळ कमी करण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या बारा आमदाराचे निलंबन केले असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. निलंबन रद्द करा व हे सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मंगळवारी पुसद तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देऊन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे, विश्वास भवरे, धनंजय अत्रे, निखिल चिद्धरवार, रुपाली जयस्वाल, अश्विन जयस्वाल, दीपक परिहार, मयूर पाध्ये, ओमप्रकाश शिंदे, सौरभ जयस्वाल, संतोष मुकेश, विठ्ठल पुलाते, शुभम काळबांडे, राहुल देशमुख, विश्वास भवरे, नटवरलाल उंटवाल, सनी देशमुख, राहुल कांबळे, रेश्मा लोखंडे, पंजाब भोयर, शेखर वानखेडे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.