लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील नगरपरिषदेच्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष अनिताताई मनोहरराव नाईक यांनी २०२०-२१ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. सभागृहाने ३५ कोटी ३८ लाख रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी बहाल केली.पालिकेच्या सभागृहात अंदाजपत्रक सादर करण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी ३५ कोटी ३८ लाख ९० हजार ५८० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी प्रदान केली. मात्र भाजपच्या नगरसेविका डॉ.रूपाली जयस्वाल यांनी नगराध्यक्षांनी ३५ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. मात्र शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. शिलकीच्या ३५ कोटींचे लोणचे घालणार का, असा संतप्त सवाल यांनी केला. भाजपच्या दुसऱ्या नगरसेविका अनिता चव्हाण यांनीही प्रभाग क्र.१४ मध्ये कोणतीही विकास कामे झाली नाही, असा आरोप केला.भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.विशेष म्हणजे या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसण्याची सत्ताधारी व विरोधकांनी तसदी घेतली नाही. नगराध्यक्ष अनिताताई यांनी यांनी अंदाजपत्रकातून पुढील आर्थिक वर्षात राबविण्यात येणाºया विविध विकास कामांची जंत्री सादर केली. मागील वर्षीच्या तुलनेत सातपटीने अधिक शिल्लक असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी पाच कोटी शिलकीचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला होता. यावर्षी शिलकीत सातपटीने वाढ झाल्याचे दिसून आले.काँग्रेस नगरसेवकाचा सभात्यागकाँग्रेसचे नगरसेवक शाकीब शहा यांनी पत्रकारांना सभागृहात बसण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी थोडीही सहानुभूती दाखविली नसल्याचा आरोप करून सभात्याग करीत असल्याचे सांगितले. बैठकीत उपाध्यक्ष डॉ.अकील मेमन, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची माहिती दिली. शिवसेनेचे नगरसेवक अॅड.उमाकांत पापीनवार यांनी अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याचे सांगितले.
पुसद नगरपरिषदेचे ३५ कोटी ३८ लाखांचे शिलकीचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM
भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
ठळक मुद्देविकासाचा मात्र बोजवारा । सातपटींनी वाढली शिल्लक, अर्थसंकल्प मंजूर