सूतगिरणीने मासिक ७५० रुपये वेतनवाढ देण्याचे घोषित केले. सूतगिरणीला कोविडच्या काळातही उभारी देणारे आसेगावकर यांनी कामगारांचे श्रम पाहून २८० कामगारांना दोन लाखांची वेतनवाढ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे गिरणीवर वार्षिक २५ लाखांचा बोजा पडणार आहे. अध्यक्षांना संचालक मंडळाचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.
माजी आमदार मनोहरराव नाईक यांनी सूतगिरणीची धुरा आसेगावकर यांच्या खांद्यावर टाकली. त्यांनी सूतगिरणीला तोट्यात न ढकलता नफ्यात आणून कामगारांचे ऋण फेडण्यासाठी वेतनवाढ केली. गिरणीतील दर्जेदार सूताची निर्यात कंटेंरनरद्वारे परदेशात पोहोचविण्याची जादू त्यांनी करून दाखवली. सूतगिरणीचे गुणवत्तापूर्ण सूत चीन व हाँगकाँग देशात पाठविण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात सूतगिरणीमध्ये उपलब्ध टीएएफओ या अद्यावत यंत्रावर तयार करण्यात आलेले १६ काऊंटचे दीडशे टन सूत निर्यात करण्यात आले आहे.
बॉक्स
कामगार संघटनाचे सहकार्य
सूतगिरणीचे कामगार अध्यक्ष प्रताप जीवला राठोड यांनी केलेल्या सहकार्याने सूतगिरणीने लॉकडाऊननंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सुताचे उत्पादन सुरू ठेवले. कामगारांच्या श्रमातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे. त्यामुळेच कामगारांच्या कष्टाची दखल घेत वार्षिक २५ लाख रुपये वेतनवाढ घोषित करण्यात आली आहे.