प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शेती आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारे, हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे तब्बल ११ वर्षे मुख्यमंत्री पद सांभाळणारे दिवंगत वसंतराव नाईक यांचे येथे ‘वसंत स्मारक’ उभारण्यात आले. शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी व त्यांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने राज्य शासनाने वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे स्मारक उभारले. मात्र गेल्या चार वर्षांपासून स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या काकडदाती ग्रामपंचायतींअंतर्गत चार एकर परिसरात भव्य ‘वसंत स्मारक’ उभारण्यात आले. तत्कालिन सरकारने २०१४-१५ मध्ये त्यांचा सन्मान म्हणून तब्बल नऊ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय गहुलीच्या स्मृतिस्थळ विकासासाठी दोन कोटींचा निधी दिला होता. एकूण १२ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला. त्यानंतर २०१६ मध्ये या जागेवर स्मारकाचे निर्माण कार्य पूर्ण झाले.तत्पूर्वी शहरात वसंत उद्यान अस्तित्वात होते. या उद्यानात तत्कालिन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले होते. हाच पुतळा आता ‘वसंत स्मारक’मध्ये उभा आहे. या जागी राज्यातील शेतकºयांच्या मार्गदर्शनासाठी चर्चासत्र व कार्यशाळा भरविण्यासाठी दोन मजली अत्याधुनिक सभागृह उभारण्यात आले. त्यात ४५० जणांची आसन व्यवस्था असून चार व्हीआयपी खोल्या आहेत.दिवंगत वसंतरावांच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने वस्तू संग्राहलयाची (म्युझियम) वास्तूही उभारण्यात आली. बाजूला तीन अतिथी कक्ष उभारले. स्मारकाचे सौंदर्यीकरण व इंटेरियर सजावटीचे कामही पूर्ण झाले आहे. दक्षता व गुणनियंत्रण पथकाचे तत्कालिन अधीक्षक अभियंता व तत्कालिन जिल्हाधिकारी आदींनी या वास्तूची पाहणी केली. स्मारकात शेतकरी वाचनालयसुद्धा उभारण्यात आले. यावर आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च झाले. मात्र चार वर्षांपासून बांधकाम पूर्ण होवूनही स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.राजकीय उदासीनतादिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त ‘वसंत स्मारक’ पूर्ण झाले. मात्र भविष्यातील देखभाल व दुरुस्तीच्या दृष्टीने हे स्मारक स्वत:कडे घेण्यास काकडदाती ग्रामपंचायत इच्छुक नाही. आता नव्याने हे स्मारक वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश झळके यांनी सांगितले.
पुसदचे ‘वसंत स्मारक’ दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 6:00 AM
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या काकडदाती ग्रामपंचायतींअंतर्गत चार एकर परिसरात भव्य ‘वसंत स्मारक’ उभारण्यात आले. तत्कालिन सरकारने २०१४-१५ मध्ये त्यांचा सन्मान म्हणून तब्बल नऊ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय गहुलीच्या स्मृतिस्थळ विकासासाठी दोन कोटींचा निधी दिला होता.
ठळक मुद्देदहा कोटींचा खर्च : चार वर्षांपासून बांधकाम पूर्ण, मात्र उद्घाटनाची प्रतीक्षाच