पुसद : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीचे महासचिव वसंत कालेकर व सचिव माया कालेकर या दाम्पत्याने आंतरराष्ट्रीय योग शिक्षक वायसीबी लेव्हल २ ह्या आयुष मंत्रालयाच्या परीक्षेत यश प्राप्त केले.
महासंघाच्या जिल्हा सोशल मीडिया प्रभारी शुभदा नारखेड़े ह्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या ऑटोनॉमस कॉलेज विद्यापीठातून डिप्लोमा इन योग एजुकेशन या परीक्षेत प्रथम मेरिट आल्या. महासंघाचे पुसद येथील ३५ योग साधक वाशिम येथील माउली इन्फोटेक या संस्थेतून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील डिप्लोमा इन योग टीचर या परीक्षेला बसले आहे. या योग शिक्षकांचे महासंघाचे राज्य प्रभारी डॉ. मनोज निलपवार, मनोज नाईक, विलास पालिकोंडावार, शरद बजाज, डॉ. प्रल्हाद वावरे, प्रा. प्रमोद हरने, प्रवीण मस्के, विजया चव्हाण, डॉ. कोमल भोसले, रेश्मा राठोड, लता देशमुख, योगिता जाम्बुतकर, राजू चक्करवार, प्रशांत अर्धापूरकर, कल्पना मस्के, वंदना कदम, श्रद्धा वानखड़े, सोनाली नांदेडकर आदींनी कौतुक केले.