लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराला दोन दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा रद्द करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. आता १६ जुलैपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.मागीलवर्षी पूस धरण परिसरात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे धरणातील जलसाठा कमी झाला होता. त्यामुळे नगरपरिषदेने डिसेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला होता. नंतर धरणातील जलसाठा कमी होताच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. नगरपरिषदेच्या नियोजनबद्ध पद्धतीमुळे उन्हाळ्यात पुसदकरांना तीन दिवसाआड का होईना, पाणी मिळत होते. त्यामुळे पुसदकरांना पाणीटंचाईची फारशी झळ बसली नव्हती.मागील सहा महिन्यांपासून पुसदला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. जून महिन्याच्या सुरूवातीपासून पूस धरण परिसर व धरणाच्यावरील वाशीम, अनसिंग, लाखी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ होत गेली. सध्या ७० टक्के पाणीसाठा आहे. मे महिन्यात पूस धरणात केवळ ३ टक्के जलसाठा होता. आता धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.अतिरिक्त पाणीसाठा करावासोमवारपासून नगरपरिषद प्रशासन दररोज पाणी पुरवठा करणार असले, तरी नागरिकांनी एक दिवसाचा अतिरिक्त पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी आल्यास जलशुद्धीकरण कामात अडथळा येतो. त्यामुळे पाणी पुरवठा कदाचित खंडित होण्याची शक्यता असतते. त्यामुळे पुसदकरांनी सध्या अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती राजु दुधे यांनी केले आहे.
पुसदकरांना आता दररोज पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:38 PM
शहराला दोन दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा रद्द करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. आता १६ जुलैपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.
ठळक मुद्देसोमवारपासून प्रारंभ : नगर परिषदेचा निर्णय, पूूसमध्ये ७0 टक्के जलसाठा