लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला. त्यांनी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.फुलसावंगी येथील कब्रस्तान गावानजीकच्या नाल्याच्या पैलतीरावर आहे. या नाल्यावर कोणताही पूल नाही. पावसाळ्यात नाला भरून वाहतो. अशा काळात कुणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी यातना सहन कराव्या लागते. गुडघाभर पाण्यातून जावे लागते. हा प्रकार सुरुवातीला आमदार राजेंद्र नजरधने यांना सांगितला. त्यांनी नाबार्डमधून पुलासाठी प्रस्ताव दाखल केला. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मंजुरी मिळाली नाही.दरम्यान, खासदार राजीव सातव फुलसावंगी येथे आले होते. त्यावेळी मुस्लीम बांधवांसह शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पुलाची मागणी लावून धरली होती. यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार सातव यांनी दिले.
फुलसावंगीतील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 10:12 PM
कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला.
ठळक मुद्देखासदारांचे आश्वासन : अंत्यसंस्कारासाठी प्रचंड त्रास