लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यातील ३४ अतिरीक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता शिक्षण उपसंचालकाच्या दरबारात पोहोचला आहे. शिक्षण उपसंचालक यावर काय निर्णय घेतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.शिक्षणाधिकाºयांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तर केले. परंतु संस्थाचालकांनी ३४ शिक्षकांना रूजू करून घेतले नाही. त्यामुळे त्यांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले आहे. विमाशिच्या पदाधिकाºयांनी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची भेट घेऊन शिक्षकांचे वेतन काढण्याची मागणी केली. मात्र वरिष्ठांचे तसे निर्देश असल्याने वेतन काढण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकाºयांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र देऊन याबाबत मार्गदर्शन मागितले.विमाशिचे प्रांतीक उपाध्यक्ष अरविंद देशमुख व मुरलीधर धनरे काही अतिरीक्त शिक्षकासह शिक्षण उपसंचालकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. वेतन सुरू करा किंवा अतिरीक्त शिक्षकांना रूजू करून घेण्यास संस्थांना भाग पाडा, अशी विनंती केली. मात्र शिक्षण उपसंचालकांनीही वरिष्ठांकडे बोट दाखविले.
शिक्षकांचा प्रश्न उपसंचालकांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:57 AM
जिल्ह्यातील ३४ अतिरीक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता शिक्षण उपसंचालकाच्या दरबारात पोहोचला आहे. शिक्षण उपसंचालक यावर काय निर्णय घेतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देविमाशिचा पुढाकार : मूळच्या शाळेतून वेतन काढण्याची मागणी