शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती.

ठळक मुद्देसंचारबंदीत गर्दी : वयोवृद्धांची संख्या अधिक, काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला फाटा, पोलिसांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी वगळता मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर निघण्यास मनाई आहे. असा प्रयत्न करणाऱ्या सुमारे शंभरावर लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मंगळवारी यवतमाळ शहर व जिल्हाभर अनेक बँकांसमोर प्रचंड गर्दी दिसल्याने जणू लॉकडाऊनचे लॉक तुटल्याचा भास होत होता.शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती. काही ठिकाणी सावलीची व्यवस्था होती तर कुठे व्यवस्था असूनही त्याचा उपयोग होऊ शकला नाही. काही ठिकाणी सावली शोधण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंग झुगारण्यात आले. जनधन खात्यातील पैसे काढणाऱ्यांमध्ये बहुतांश वयोवृद्धांचा समावेश होता. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कुुटुंब कल्याण योजनेचा दोन हजारांचा हप्ता बँकेत जमा झाला का हे तपासण्यासाठीही कित्येकांनी सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. काहींना केवळ बॅलन्स चेक करायचे होते, या गर्दीमध्ये निवृत्ती वेतनधारक, निराधारांचे मानधनधारक यांचाही समावेश होता.स्टेट बँकेच्या धामणगाव रोड स्थित मुख्य शाखेत मोठी रांग पहायला मिळाली. याच बँकेच्या मार्इंदे चौक रोडवरील शाखेतही अशीच स्थिती होती. आझाद मैदानासमोरील महाराष्ट्र बँक तसेच युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य बँकांच्या शाखामध्ये खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिव्हील लाईन येथील मिनी एटीएम शाखेत तर नागरिकांची गर्दी चक्क रस्त्यावर आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांब रांग पहायला मिळाली. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली गेली होती. परंतु सोशल डिस्टन्सिंग व रांगेमुळे त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. त्यांना बाहेर थांबावे लागले. बँकेत आलेले ग्राहक अंतर पाळत नाहीत म्हणून त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांना पाचारण केले गेले. पोलिसांनी त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र नागरिकांचा नाईलाज होता. एवढ्या कडाक्याच्या उन्हात कुठे सोशल डिस्टन्सिंग पाळावे असा सवाल ते पोलिसांनाच विचारताना दिसले. या गर्दीत काहींनी मास्क लावला नसल्याचेही धोकादायक चित्र पहायला मिळाले. शहरात एका ठिकाणी भोजन वाटप सुरू होते. तेथेसुद्धा गरजूंनी प्रचंड गर्दी केली. परंतु सोशल डिस्टन्सिंग, मास्क व कोरोनापासून सावधगिरीच्या अन्य उपाययोजनांना तेथे फाटा दिला गेल्याचे चित्र होते. जनधनच्या ५०० रुपयांसाठी झालेली गर्दी पाहून गोरगरिबांच्या लॉकडाऊनमधील आर्थिक स्थितीचा अंदाज येतो.रांगेतील नागरिकांंना पाणीही नाहीयवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्त्यांची बरीच गर्दी पहायला मिळते. बहुतांश प्रामाणिकच कार्य करीत असली तरी काही जण मात्र केवळ पोलीस पासवर संचारबंदीतही बिनधास्त फिरता येते म्हणून हंगामी सामाजिक कार्यकर्ते बनले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष वर्तणुकीतून हीबाब अधोरेखीत होते. मंगळवारी अनेक बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात वयोवृद्धांची संख्या अधिक होती. तेथे तैनात असलेल्या पोलिसांना हे काही सामाजिक कार्यकर्ते आवर्जुन नाश्ता, जेवण, पाणी आणून देत होते. त्याच वेळी रांगेत उभ्या असलेल्या वयोवृद्धांनाही किमान पाणी देऊन त्यांची सेवा करण्याची माणुसकी कुणीही दाखविली नाही. हे नागरिक पाण्यासाठी कार्यकर्त्यांच्या तोंडाकडे पाहत होते. अशा संधीसाधू सामाजिक कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने मग केवळ सेवा हाच हेतू ठेऊन घराबाहेर पडलेल्यांकडेही साशंकतेने पाहण्याची समाजाला संधी मिळते.यवतमाळच्या भाजी मंडईत सारेच बिनधास्तसंदीप टॉकीज परिसरातील विठ्ठलवाडी नजीकच्या कॉटन मार्केट भागात दररोज भाजी मंडई भरते. मंगळवारी सकाळी तेथे कोरोना असूनही खरेदीसाठी आलेले नागरिक बिनधास्त वागताना दिसले. तेथे ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क होते. विशेष असे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना खरोखर होत आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आहे. या मंडईत नगरपरिषदेचे वाहन व कर्मचारी तैनात होते. परंतु त्यांचे या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले.

टॅग्स :bankबँक