शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुसद उपविभागात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:29 PM

पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देदराटीत ११५ मिमी : उमरखेड, महागाव तालुक्यातील नागरिकांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.पुसद येथे पालिकेसमोरील जुने पिंपळाचे झाड संततधार पावसामुळे उन्मळून पडले. त्यामुळे गांधी चौक ते तहसील चौक दरम्यानची वाहतूक ठप्प पडली. संततधार पावसामुळे पूस धरण ओव्हर फ्लो झाले आहे. शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. काही भागातील वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.उमरखेड तालुक्यात दराटी येथे तब्बल ११५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शिवाजीनगर व कोरटा येथील अनेक घरात पाणी शिरले. प्रशासनाने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. उमरखेड-पुसद मार्गावरील वाहतूक सकाळी ९ वाजतापासून बंद आहे. दहागाव नाल्याला पूर आल्याने तसेच मुळावा-शेंबाळपिंपरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार भगवान कांबळे व प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.महागाव तालुक्यात करंजखेड, धनोडा, गुंज, तिवरंग आदी गावांत पाणी शिरले. रेड झोनमधील मोरथ, वाकोडी, कलगाव, अनंतवाडी, हिवरा, जनुना, करंजखेड, संगम, काळी दौ., वडद, ब्रह्मी आदी गावात नाल्याच्या काठावरील घरात पाणी शिरले. तेथील नागरिकांना शाळेत हलवून प्रशासनाने त्यांची जेवणाची व्यवस्था केली. धनोडा पुलावरून पाणी वाहात असल्याने माहूरकडील वाहतूक बंद झाली. १५ गावांत पाणी शिरले असून वाकान व तिवरंगचा संपर्क तुटला. प्रशासनाने यवतमाळातून बचाव पथक पाचारण केले. धनोडा येथे माहूरला जाणारे अनेक प्रवासी खोळंबून पडले आहे. तिवरंग येथे भाऊराव जगताप यांची चार जनावरे पुरात वाहून गेले. तहसीलदार नामदेव इसाळकर, नायब तहसीलदार जी.एम. कदम, ठाणेदार दामोदर राठोड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वेणी धरणावरून गोविंदा अडाणे, गणेश लोणारे यांना होडीसह वाकानला पाठविण्यात आले आहे.दिग्रसमध्ये शंकरनगर, अंबिकानगर, शिवाजी चौक आणि मानोरा चौकापर्यंत पाणी पोहोचले.महागावात १५ गावांना सतर्कतेचा इशारासवना : येथून जवळच असलेल्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाचे आठ दरवाजे प्रत्येकी सव्वा मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४८ क्यूबिक मीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूस नदी काठावरील मोरथ, वाकोडी, महागाव, कलगाव, करंजखेड, जनुना, हिवरा, वाघनाथ, संगम, अनंतवाडी, धनोडा येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धारेगाव येथे जनावरे वाहून गेलीबिजोरा : महागाव तालुक्यातील धारेगाव येथील नाल्याच्या पुरात काही जनावरे वाहून गेली. नेमकी किती जनावरे वाहून गेली याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस पाटील दत्तराव इंगळे यांनी प्रशासनाला माहिती दिली. नाल्या काठावरील अनेक घरातही पाणी शिरले आहे.पिके पाण्याखालीउमरखेड : तालुक्यात कृष्णापूर शिवारात अनेक शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे जवळपास ४०० एकरातील पिके पाण्याखाली आली आहे. अनेकांचे स्प्रिंक्लर पाईप वाहून गेले. पिरंजी, कृष्णापूर, ढाणकी परिसरातील शेतकऱ्यांची हानी झाली. शिवाय महागाव तालुक्यात अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने तारांबळ उडाली. खडका-गुंज रस्त्यावर झाड कोसळल्याने मार्ग बंद आहे.धावंडाचे पाणी दिग्रसमध्ये शिरलेदिग्रस : गुरुवारी दुपारी ३.३० वाजतापासून दिग्रसला झोडपून काढले. यात धावंडा नदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. काही घरात जवळपास तीन फूट पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी ४ वाजतापासून नेटसेवाही ठप्प होती.

टॅग्स :Rainपाऊस