लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना अचानक आलेल्या या पावसाने उकाड्यात आणखीनच भर घातली. वादळामुळे परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. मात्र सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. सोसाट्याच्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.वादळ सुरू होताच, रात्री ८ वाजता वणी शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला. वादळ शमल्यानंतर काही परिसरात वीज पुरवठा रात्री ११ वाजता सुरळीत सुरू झाला. मात्र अनेक गावे रात्रभर अंधारात होती. पाऊस येऊन गेल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली. घामाच्या धारा अन् त्यात डासांचा उपद्रव यामुळे ग्रामीण नागरिकांना रविवारची रात्रं जागून काढावी लागली.वादळाने मारेगावकडून वणीत ‘एन्ट्री’ केली. रविवारी दिवसभर या भागात कडाक्याचे उन्ह होते. मात्र सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. सुमारे एक तास सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. लगतच्या चिखलगाव येथे यवतमाळ मार्गावर वादळामुळे भले मोठे झाड उन्मळून पडले. यावेळी सुदैवाने या झाडाखाली कुणी उभे नव्हते. वणी तालुक्यातील निंबाळा येथे काही घरांवरील टिनपत्र्याचे शेड उडून गेल्याने संबंधित नागरिकांची वादळात चांगलीच तारांबळ उडाली. ठिकठिकाणी वीज तारा तुटल्याने वीज वितरणात व्यत्यय आला. काही भागात रविवारी रात्रीच वीज कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त केला. काही ठिकाणी मात्र सोमवारी दोष दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले.कर्मचारी तुटवड्याचे ग्रहणवणी, मारेगाव व झरी तालुक्यातील वीज वितरण कंपनीला कर्मचारी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. उन्हाळ्यात वीज समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असताना वीज वितरण कंपनीत मात्र कर्मचाºयांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी एखाद्या ठिकाणी दोष निर्माण झाल्यास तो वेळेच्या आत दुरूस्त केला जात नाही.
वणी परिसराला अवकाळी वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 9:38 PM
रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना अचानक आलेल्या या पावसाने उकाड्यात आणखीनच भर घातली. वादळामुळे परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. मात्र सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.
ठळक मुद्देझाडे उन्मळून पडली : घरांवरील छत उडाले, अनेक गावे अंधारात