लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध चौकांमध्ये पुतळे उभारले जात आहे. यात नियमांचे उल्लंघन करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डावलण्यात आले, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. शाहू महाराजांचा पुतळा न उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनातून गुरुवारी देण्यात आला.स्थानिक पोस्ट आॅफिस चौकामध्ये अनेक वर्षांपासून शाहू महाराजांचे तैलचित्र आहे. तरीही या चौकामध्ये शाहू महाराजांना डावलून योगमुद्रेचा पुतळा बसविण्यात आला. पुतळे उभारताना कुठल्याही नियमाचे पालन झाले नाही. नगरपरिषदेमध्ये याबाबत कुठलाही ठराव झाला नाही. हे पुतळे अतिक्रमणात येतात, असा आरोपही सामाजिक संघटनांनी केला.निवेदन देतेवेळी सत्यशोधक समाज संघटना, ओबीसी आरक्षण बचाव समिती, मराठा सेवा संघ, सावित्रीबाई फुले मंडळ, कास्ट्राईब संघटना, नाग संघटना, समतापर्व प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना, बामसेफ, ग्रॅज्युएट शिक्षक संघटना आदींचा सहभाग होता. या सर्व संघटनांनी एकमुखाने शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.यावेळी डॉ. दिलीप घावडे, रमेश गिरोळकर, प्रदीप वादाफळे, नवनीत महाजन, आनंद गायकवाड, बिपीन चौधरी, विठ्ठल नागतोडे, संजय बोरकर, पंडीत दिघाडे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, दिलीप नगराळे, डॉ. दिलीप महाले, अंकुश वाकडे, जगदीश रिठे, सविता हजारे, सुनिता काळे, दीपक वाघ, विनोद डाखोरे, मनोज ठाकरे उपस्थित होते.
यवतमाळात पुतळे उभारताना शाहू महाराजांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 9:36 PM
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध चौकांमध्ये पुतळे उभारले जात आहे. यात नियमांचे उल्लंघन करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डावलण्यात आले, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. शाहू महाराजांचा पुतळा न उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनातून गुरुवारी देण्यात आला.
ठळक मुद्देसंघटनांचा एकमुखी आरोप : तीव्र आंदोलनाचा जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा