शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

राळेगावात ३८० शेतकऱ्यांची तूर उघड्यावर

By admin | Published: May 18, 2017 12:52 AM

बाजार समितीत तुरीची प्रचंड आवक झाली असून आतापर्यंत ३८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ढिसाळ नियोजन : दिवसभरात केवळ तीन शेतकऱ्यांची तूर खरेदी लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : बाजार समितीत तुरीची प्रचंड आवक झाली असून आतापर्यंत ३८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी नाफेड अधिकारी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या तुरीच्या आवकमुळे बाजार समितीचे पक्के शेड अपुरे पडत असून शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या मांडल्याचे सांगितले. पाच हजार ५० या आधारभूत भावाने तुरी खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक येथील व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी काळजीत आहे. ढिसाळ नियोजन आणि अपुरी यंत्रणा याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी दिवसभरात बाजार समितीमध्ये केवळ तीन शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांची संख्या पाहता यंत्रणा अतिशय कमी असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते.