शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

By admin | Published: February 25, 2017 1:01 AM

पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले.

पंचायत समिती : भाजप-काँग्रेसकडे तीन-तीन दावेदार, एकत्र बसून तोडगा शोधण्याची शक्यता कमी के.एस. वर्मा   राळेगाव पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले. आता सभापती व उपसभापतीपदी कोणत्या पक्षाचे उमेदवार येतील, हा निर्णय ‘टाय’ झाला आहे. सभापतीपद खुले आहे. सहा पैकी कुणाचेही वर्णी लागू शकते. निवडीच्या दिवशी दोनही पक्षांचे नेते एकत्र येवून तोडगा काढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीनेच ही दोनही पदे ठरविली जातील, असे चित्र दिसत आहे. झाडगाव सामान्य व वाढोणाबाजार या इतर मागास प्रवर्गात भाजप, सेना, काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. प्रशांत तायडे यांनी ३६०५ मते घेतली, तर सेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी २२३७ मते घेतली. तायडे १३६८ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे अरविंद राडे यांना केवळ १९३० मते मिळाल्याने काँग्रेसची परंपरागत व जोडलेली मते त्यांना मिळाली नाही. ही मते दुसरीकडे वळविण्यात आल्याची चर्चा मतदान काळात रंगली होती. घरात मोठे वडील स्व. डॉ. पुरुषोत्तम इंगोले, आई शुभम इंगोले हे दोन सदस्य जिल्हा परिषदेचे पाच-पाच वर्षे अध्यक्ष राहिले होते. तरी काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. म्हणून तृषित इंगोले यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविली. १००४ मते घेवून ते पडल्याने काँग्रेसला संकटात टाकले. वाढोणाबाजार गणात प्रवीण कोकाटे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ४२३५ मते घेतली. भाजपच्या ज्ञानेश्वर मांडवकर यांना ३७७३ मते मिळाली. ४६२ मतांनी त्यांचा पराभव झाला. धानोरा गणात भाजपच्या स्नेहा विजय येनोरकर यांनी ३३५४ मते घेतली. काँग्रेसच्या मंगला राजू ठाकरे यांना २७५४ मते मिळाली. ६०० मतांनी येथे काँग्रेसचा पराभव झाला. येथे काँग्रेसची उमेदवारी चुकल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच सीमा तेलंगे यांना जळका गटाची दिलेली उमेदवारी त्यांची निष्क्रिय कामगिरी, वादग्रस्त कारकिर्द, यजमान व भावाची कामात लुडबुड, ठेकेदारी, यवतमाळचे वास्तव्य, मतदारांशी संपर्क नसणे आदी बाबींचा फटका धानोरा व जळका येथे काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. जळक्यात माजी उपसभापती नलिनी पराते यांनाही त्यांची निष्क्रिय कामगिरी यजमानाची लुडबुड, बदललेला मतदारसंघ यांचा फटका बसला. त्यांना केवळ २०७७ मते मिळाली. भाजपच्या शीला मारोती सलाम यांना ३७५१ मते मिळाली व १६७४ इतक्या प्रचंड मतांनी विजय झाला. वरधमध्ये काँग्रेसच्या ज्योती रवींद्र खैरकार यांनी २६२७ मते घेत २२८९ मते घेणाऱ्या भाजपच्या सीमा धोटेचा ३३८ मतांनी पराभव केला. वरधमध्ये काँग्रेसच्या नीलेश रोडे यांनी भाजपच्या रामकृष्ण आत्राम यांचा ६०४ मतांनी पराभव केला. कोलाम समाजाचे बाहुल्य रोडे यांना तारणारे ठरले. आता मतदारांचे लक्ष सभापती, उपसभापतीपद कुणाला मिळते याकडे लागले आहे.