लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील छत्रपती शिवाजी चौकात माणुसकीची भिंततर्फे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला.माणुसकीची भिंत सदस्यांनी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने राहावे व एक मेकाच्या धर्माचा आदर करावा, असे आवहन केले. जाती-धर्माच्या नावावर राजकारणी लाभ घेतात. त्यांना बळी न पडता सर्व महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आपण सगळे एकच आहोत ही भावना ठेवणे गरजेचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.रमजान महिना हा दया, करुणा व क्षमा याची शिकवण देतो, असे माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सांगितले. या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून श्रीरामपूर येथील जीवन हास्य अनाथ बालगृह येथील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शालेय साहित्य, कपडे व इतर वस्तू ठेवण्यासाठी १२ पेट्या, तसेच वह्या, पेन वाटप करण्यात आले. अनाथांना सण किंवा वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन किंवा अन्नधान्य, कपडे देऊन मदत करावी, असे आवाहन गजानन जाधव यांनी केले. यावेळी जगत रावल, सोनू पाटील, अण्णा काळे, संतोष पत्रे, प्रल्हाद गुहाडे, मधुकर वाळूकर, सागर चिद्दरवार, सचिन बाभूळकर, संदीप आगलावे, सैय्यद रोशन, सैय्यद मुसा, संतोष गावडे, मारुती भस्मे, शाकिब शहा, लक्ष्मण पोटे, मोहम्मद फारुख, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसूमाणुसकीची भिंत सदस्यांनी श्रीरामपूर येथील अनाथालयातील चिमुकल्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणापुरते का होईना हसू उमलले. त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ऐरवी या अनाथालयाकडे कुणीही फिरकत नाही. मात्र माणुसकीची भिंततर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून मदत केली जाते. संस्थेने अनाथालयाला मदतीचे आवाहनही केले आहे.सामाजिक एकतेची किनारयेथील छत्रपती शिवाजी चौकात माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. नंतर विद्यार्थ्यांना शलेय वस्तू व पेट्यांचे वाटप केले. या कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. माणुसकीची भिंत सदस्यांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
पुसदमध्ये माणुसकीची भिंततर्फे रमजान ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 9:39 PM
येथील छत्रपती शिवाजी चौकात माणुसकीची भिंततर्फे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला. माणुसकीची भिंत सदस्यांनी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने राहावे व एक मेकाच्या धर्माचा आदर करावा, असे आवहन केले.
ठळक मुद्देसंडे अँकर । मुस्लीम बांधवांचे गुलाबपुष्प देवून स्वागत, अनाथालयात विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व पेट्यांचे वाटप