वनौपजमध्ये सध्या जंगलातील रानभाज्या संकलित करणे आणि त्याचा वापर करण्याबाबत ग्रामसभा प्रतिनिधी पुढे येत आहे. आदिवासी समुदाय परंपरेने रानभाजीचा उपयोग करीत आहे. या रानभाज्यांबाबत माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी, त्याचे औषधी गुणधर्म माहीत व्हावे, याकरिता रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. या रानभाजी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी दिशा महिला महासंघाच्या अध्यक्षा वच्छला मडावी होत्या. आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षा अर्चना मेश्राम यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून ए.सी.एफ.विजय तळणीकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी पवार, महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियानाचे तालुका व्यवस्थापक गणेश आत्राम, दिलासा संस्थेचे मन्सूर खोरासी, नवी उमेद संस्थेचे अमित कुलकर्णी, सुनीता सातपुते, शीतल ठाकरे, मोहन जाधव उपस्थित होते. श्रीकांत लोडम यांनी संचालन केले. या महोत्सवामध्ये झरी, मारेगाव, केळापूर व घाटंजी तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त गावातील १२० महिलांनी जंगलातील १७ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते. यशस्वितेकरिता दिलीप सातपुते, रवींद्र सिडाम, प्रमोद येवातकर, राहुल प्रदान, गीता आत्राम, प्रमिला खांडरे, अर्शनीलम शेख, सुनील हिवराळे यांनी परिश्रम घेतले.
पांढरकवडा येथे रानभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:46 AM