आॅनलाईन लोकमतयवतमाळ : मध्य भारतात क्वचितच आढळणारा दुर्मिळ बहिरी घुबड (ब्राउन हॉक आऊल) शहराच्या मध्यवस्तीत आढळला. येथील पक्षी अभ्यासकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असून यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाली आहे.गेल्या महिनाभरापासून आदित्य जवादे यांच्या अंगणातील अशोकाच्या झाडावर या पक्ष्याचे वास्तव्य आहे. त्याची प्रथम नोंद प्रा. वेद पत्की आणि प्रा. अश्विन अटकुलवार या पक्षी निरीक्षकांनी घेतली. हा बहिरी घुबडच आहे का, याची ओळख पटविण्यासाठी त्यांनी डॉ. प्रवीण जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले असता हा पक्षी बहिरी घुबडच असल्याचे स्पष्ट केले.डॉ. दीपक दाभेरे यांच्या मते, हा सर्वसाधारण २३ सेंटीमीटर उंच, सडपातळ बांध्याचा, लांब शेपटी, निमूळते डोके, संपूर्ण तपकिरी रंगाचा पक्षी असून त्याचे डोके राखडी, पोटावर ठिपके असतात. विशेष म्हणजे, चोचीवर व डोक्याच्या मध्यभागी त्रिकोणी पांढरा ठिपका, ही त्याची महत्त्वाची ओळख आहे. प्रा. डॉ. प्रवीण जोशी म्हणाले, या पक्ष्याचे वास्तव्य हिमालयाच्या पायथ्यापासून उत्तर पूर्व भारतात असते. परंतु, मध्य भरतात याच्या अतिशय कमी नोंदी आहे. यवतमाळात ही त्याची पहिलीच नोंद आहे.
यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत आढळले दुर्मिळ बहिरी घुबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:38 AM
मध्य भारतात क्वचितच आढळणारा दुर्मिळ बहिरी घुबड (ब्राउन हॉक आऊल) शहराच्या मध्यवस्तीत आढळला. येथील पक्षी अभ्यासकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असून यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देपक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद