लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : यावर्षी नगरपंचायतमार्फत बसस्थानक ते चिंतामणी मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु, या रस्त्याच्या कामात कुठलेही नियोजन नसल्याने रस्त्यावरचे पाणी सरळ दुकानात शिरत आहे. त्यामुळे गुरुवारी शेकडो संतप्त नागरिकांनी या रस्त्याचे चुकीचे काम करणाऱ्या नगरपंचायत अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले.लाखो रुपयांचा सिमेंट रस्ता तयार करताना मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रस्ता खोदून रस्त्याची उंची दुकानाच्या पायव्यापेक्षा कमी करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अभियंता व ठेकेदाराचा मनमानीपणा रस्त्याच्या चांगलाच मुळाशी आला. त्यामुळे दुकानापेक्षा रत्याची उंची मोठी झाली. परिणामी आता पावसाचे पाणी सरळ दुकानात शिरते. त्यामुळे अनेकांचे साहित्य खराब होत आहे. हा प्रकार वारंवार होत असल्याने अनेकांना वैताग आला आहे. एवढेच नव्हेतर रस्ता बनविताना पाणी कुठून काढायचे याचे कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. इंदिरा चौकामध्ये जे पाईप टाकण्यात आले. त्याचा व्यास अतिशय कमी आहे. त्यामुळे पाणी पास होत नाही. त्यामुळे या झालेल्या कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.आंदोलनामध्ये नगरसेवक अब्दुल अजीज, मुश्ताक शेख, विजय बुरबुरे, अभिषेक पांडे, प्रमोद उरकुडे, आशिष मुळे, समीर शेख, अफसर सैय्यद, आतिफ देशमुख, वैभव काळे, शुभम रोहणकर, विनोद करणावत, शेख फैजल, मोहन व्यास, सचिन मार्इंदे, शेख मलीक, देवा पवार, गौरव येवले, संजय खैरकार, गजानन गोरे, प्रफुल्ल भुजाडे, आदर्श सुर्वे, प्रजत लभाणे, योगेश धांदे, अमीत थुल, विक्रम घोडाम, अ. शकील, सैय्यल फैजल, महमद अजहर, चंदन ठाकरे, गणेश देशकर, प्रभाकर ढाले, जीवन एकोणकर, प्रशांत बावणे, दीपक कुटेमाटे आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.कळंब येथे आधीच वाहतुकीची मोठी समस्या आहे. त्यात लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुख्य मार्गावरही प्रशासनाने चुका केल्या. त्यामुळे रस्त्यापूर्वी हाल आणि रस्त्या बांधल्यावरही हालच अशी अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे पाणी दुकानात शिरत असल्याने कळंबची मुख्य बाजारपेठच प्रभावित झाली आहे. याविरूद्धचा रोष गुरुवारी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनातून व्यक्त केला.रस्ता दुरुस्ती सामान्य फंडातून नकोरस्ता दुरुस्ती ही सामान्य फंडातून केली जाऊ नये, हा जनतेचा पैसा आहे. तो जनतेच्या कामी आला पाहजे. जे या कामासाठी जबाबदार आहे, त्यांच्याकडून हा खर्च केला जावा. मुदतीत काम न करणाºया ठेकेदाराकडून दंड वसूल करुन सुधारीत काम करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आठ दिवसात रस्ता दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी नंदू परळकर यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. त्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याच इशारा देण्यात आला. ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कळंब येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:00 AM
लाखो रुपयांचा सिमेंट रस्ता तयार करताना मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रस्ता खोदून रस्त्याची उंची दुकानाच्या पायव्यापेक्षा कमी करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अभियंता व ठेकेदाराचा मनमानीपणा रस्त्याच्या चांगलाच मुळाशी आला. त्यामुळे दुकानापेक्षा रत्याची उंची मोठी झाली. परिणामी आता पावसाचे पाणी सरळ दुकानात शिरते. त्यामुळे अनेकांचे साहित्य खराब होत आहे.
ठळक मुद्देअभियंत्यावर रोष : चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे बांधकाम