प्विदारक वास्तव : सुधाकरराव नाईकांच्या पुण्याईचा विसरपुसद : महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या तोंडावर पुसद तालुक्यातील शासकीय अधिकारी अनास्था दाखवत आहेत. तर गावागावातील लोकप्रतिनिधींची अनास्था राहिल्याने जलसंधारणाच्या कामामध्ये तालुका मागे पडला आहे. आज अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जलक्रांतीचे नवे पर्व उभे राहात असताना पुसद तालुक्यात मात्र जलसंधारणाच्या कामांचे तीनतेरा वाजले आहेत. माळपठार भागासह तालुक्यात टंचाई पाचवीलाच पुजलेल्या पुसद तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. पंचेविस वर्षापूर्वी या महाराष्ट्रात पहिल्यांदा जलसंधारण विभागाची निर्मितीचा मूलमंत्र देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांना जलसंधारणाचा जणू विसरच पडला की काय, अशी अवस्था आज पाहावयास मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी युती सरकारने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रिद घेवून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात पहिल्या वर्षी पुसद तालुक्यात दमदार सुरुवात करण्यात आली. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना अनेक गावांमध्ये राबविण्यात आली. दुसऱ्या वर्षी मात्र जलयुक्त शिवार अभियानाबाबत असलेला जोश ओसलेला दिसत आहे. लोकसहभाग कमी आणि जलसंधारणाच्या कामात ठेकेदारी बोकाळली. कामे निकृष्ट होऊ लागली. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी तर पुसद तालुक्यात सगळीकडे आनंदी आनंदच दिसत आहे. शासनाचे सर्वच विभाग कोमात गेले आहेत. जी थोडीफार कामे सुरू आहेत, ती निकृष्ट दर्जाची होत आहे. अशा कामांच्या तक्रारीही येत आहेत. शासन स्तरावरुन लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर पुसद तालुक्यातील गहुली गावाने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिलेत. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचा मंत्र व सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाचा मंत्र महाराष्ट्राला दिला. पण आज पुसद तालुक्यातील नागरिकांना हरितक्रांती व जलक्रांतीचा पूर्णत: विसर पडल्याचे वास्तव आहे. तालुक्यात कोणतेच अधिकारी सक्रिय होऊन काम करताना दिसत नाहीत. एकंदरीत जलसंधारणात पुसद तालुका पिछाडीवर गेला आहे.
रणेत्यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर
By admin | Published: April 16, 2017 1:12 AM