रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देखाव्यांची अप्रतिम कलाकृती, डोळे दीपविणारी रोषणाई, भक्तांचे लोंढे आणि भक्तीमय वातावरण यामुळे यवतमाळात स्वर्ग अवतरल्याचा भास प्रत्येकांना होतो. देशातील दुसºया क्रमांकाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया यवतमाळच्या दुर्गाेत्सवाला डोळ्यात सामावून घेण्यासाठी भक्तांचे जथ्थेच्या जथ्थे यवतमाळात दररोज दाखल होत आहेत. संपूर्ण रात्र शहरच जागे असल्यागत वातावरण असते. सायंकाळच्या सुमारास प्रत्येक मंडळापुढे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याचे चित्र दररोज अनुभवायला मिळत आहे. जयहिंद चौकातील जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५४ वे वर्ष आहे. या मंडळाने जय मल्हारचा सेट साकारला. आतमध्ये राजवाड्याची प्रतिकृती आहे. या ठिकाणची रोषणाई डोळयाचे पारणे फेडणारी आहे. बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वात हे मंडळ काम करीत आहे. या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखिची असलेल्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्याकरिता शिलाई मशिनचे वितरण मंडळातर्फे केले जाणार आहे. पाणी बचतीवर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. पवन अराठे यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते काम करीत आहेत.समर्थवाडीतील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे ३९ वे वर्ष आहे. या मंडळाने बेटी बचाव विषयाला केंद्रित केले आहे. माँ जगदंबेच्या दरबारातील नऊ कंन्या असा देखावा साकारला आहे. यासोबतच आॅक्सिजन देणारे तुळशी वृंदावनाचे दृष्य साकारले आहे. रक्तदानावर भर आहे. स्वच्छता अभियानात मंडळाने भाग घेतला आहे. मूर्तीकार राकेश प्रजापती यांनी मूर्तीला मूर्तरूप दिले आहे. मंडळाचे अध्यक्ष विनय चव्हाण, सचिव विवेक चव्हाण हे आहेत.सरस्वतीनगरातील एकवीरा दुर्गोत्सव मंडळाचे २४ वे वर्ष आहे. माँ जगदंबेचा राजवाडा साकारला आहे. विशाल मैदानातील देवीसमोरील खुल्या मैदानात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. निसर्गोपचारासह विविध विषयांवर हे मंडळ काम करीत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. ‘आत्महत्येचा विचार आल्यास तत्पूर्वी आमच्याशी बोला, मार्ग निघेल’ अये जागृती फलक त्यांनी प्रवेशद्वारावर लावले आहे. सेल्फी सेंटर या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष अनिल वाघचोरे, सचिव स्वप्नील पथ्थे, उपाध्यक्ष अंकुश गुज्जलवार यांच्यासह कार्यकर्ते काम करीत आहेत.दर्डा नगरातील शिवराय दुर्गोत्सव मंडळाचे पहिले वर्षे आहे. नऊ दिवस व्याख्यानमाला, शेतकरी, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री भ्रूणहत्या यावर विशेष कार्यक्रमही मंडळाने आयोेजित केले. पथनाट्याचे आयोजन मंडळाने केले आहे. नवरात्र उत्सव काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन्मास येणाºया कन्यारत्नाचा खास सत्कार हे मंडळ करणार आहेत. होतकरू महिलांना शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन येवले, सचिव तुषार भोयर, कोषाध्यक्ष अंकुश वानखडे, विक्रांत वानखडे, सिध्दार्थ तेलतुंबडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते झटत आहेत.रोषणाईचे विविध पैलूदुर्गोत्सवाला अधिक देखणे बनविण्यासाठी प्रत्येक मंडळाने रोषणाई केली. प्रत्येक मंडळाच्या रोषणाईचे खास वैशिष्ट्य आहे. विविध रंग आणि आकारातील रोषणाई लक्षवेधक ठरत आहे. विशेष म्हणजे कमी विमेमध्ये प्रकाशमान होतील अशाच लाईटींग बसविण्यात आल्या आहेत. काही मंडळांनी चायनाच्या सिरीज वापरणे टाळले आहे.पुरस्काराने परिवर्तनदुर्गोत्सव मंडळासाठी पोलीस विभाग आणि विविध संघटनांनी एकत्र येऊन नवरात्र उत्सव स्वच्छता स्पर्धा आयोजित केली आहे. या निकषात बसण्यासाठी प्रत्येक मंडळांनी कॅरिबॅग आणि प्लास्टीक वापर टाळला. द्रोण, पत्रावळीचा वापर केला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यास मोठी मदत झाली आहे.उत्सव बळीराजाला समर्पितविठ्ठलवाडीतील शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष मंडळाने शेतकºयांना समर्पित केले आहे. शेतकºयांची परिस्थिती आणि समाजरचना यावर या मंडळाने प्रकाश टाकला आहे. शेतात पेरणी करताना भगवान शंकर आणि खत देताना माँ पार्वती, आंबे तोडताना गणराय असा देखावा साकारला आहे. या चित्राला जिवंत करण्यासाठी ध्वनिमुद्रणाची जोड देण्यात आली आहे.संतोषी माता मंडळातर्फे दररोज महाप्रसादयवतमाळच्या नवरात्रोत्सवाला विशाल भारतात दुसºयास्थानी पोचविण्यात शहरातील सर्वच लहान-मोठ्या दुर्गोत्सव मंडळाचा हातभार आहे. यात यावर्षी ४९ वे स्थापना वर्ष साजरे करत असलेले श्याम टॉकीज चौकातील जय संतोषी माता मंडळ देखील अग्रेसर आहे. ग्रामीण-शहरी गरीब, सर्वसामान्य जनतेला वर्षभर आपले दैनंदिन जीवन जगत असताना, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना निराशेतून बाहेर काढत, त्यांना या उत्सवाचे निमित्ताने आनंदाचे चार क्षण मिळवून देणे, सोबतच त्यांच्या भूकेचीही सोय असावी म्हणून मागील अनेक वर्षांपासून मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सर्वसामान्य माणसाच्या चेहºयावर क्षणभर आनंदाचे भाव व त्याच्या भूकेची सोय ही महत्त्वपूर्ण ईशसेवा असल्याचे मंडळाच्या पदाधिकाºयांचे मत आहे. उत्सवानिमित्त दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांच्या सेवेत कुठलीही उणीव राहू नये याकरिता मंडळाचे अध्यक्ष चंदू कट्यारमल, उपाध्यक्ष पराग गाढवे, सचिव गुणवंत इंदूरकर, कोषाध्यक्ष मुरली पवार, संतोष राय, बंटी चोखानी, बाबू शहा, देवू शर्मा, निखिल जिरापुरे, अमन बोरा, सारंग पुनवटकर, निरज सिंघानिया, विकास जावळकर, मनोज पसारी, योगेश लष्करी, मनिष लष्करी, प्रतीक शहा, चंदू शर्मा, दीपक गुप्ता, राजीव कोठारी, अनिल तातेड, विशाल गाबडा, राजू गोटफोडे, शकील पटेल आदी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.चापमनवाडीतील राणी झाशी दुर्गोत्सव मंडळाचे सहावे वर्ष आहे. या मंडळाने केवळ धानाच्या पात्यापासून मंदिर बनविले. त्या समोर महाभारतातील युध्द प्रसंगातील रथ हाकताना भगवान श्रीकृष्ण साकारला आहे. तब्बल एक ट्रक धानापासून हे मंदिर उभारले आहे. एकाच कारागिराने हे मंदिर बनविले. त्याला महिनाभराचा अवधी लागला. या ठिकाणच्या मूर्तीला मातीचेच वस्त्र परिधान करण्यात आले आहे. त्यावर विविध रंगाची कलाकुसर आहे. मंडळाचे अध्यक्ष दयाराम जयस्वाल तर सचिव कचरूसेठ अग्रवाल यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. छोटी गुजरीत वेल्लुरचे गोल्डन टेम्पल साकारण्यात आले आहे. या मंडळाने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. मूर्तीकार सलिम शेख यांनी मूर्तीला पूर्णरूप दिले आहे. अध्यक्ष मनिष जयस्वाल तर, सचिव कमलेश पातालबंसी मंडळाचे काम पाहात आहेत.
स्वर्ग अवतरल्याचा भास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:28 PM
देखाव्यांची अप्रतिम कलाकृती, डोळे दीपविणारी रोषणाई, भक्तांचे लोंढे आणि भक्तीमय वातावरण यामुळे यवतमाळात स्वर्ग अवतरल्याचा भास प्रत्येकांना होतो.
ठळक मुद्देरोषणाई आणि दिव्यांची आरास