शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

युतीतील बंडखोरी काँग्रेसच्या पथ्यावर

By admin | Published: June 11, 2014 12:17 AM

अनुसूचित जातीसाठी आरक्षित उमरखेड विधानसभा मतदारसंघात चेंजची मागणी होत आहे. मुळात काँग्रेसच्या आमदाराबाबत पक्षातच नाराजी आहे.

राजेश निस्ताने - यवतमाळ अनुसूचित जातीसाठी आरक्षित उमरखेड विधानसभा मतदारसंघात चेंजची मागणी होत आहे. मुळात काँग्रेसच्या आमदाराबाबत पक्षातच नाराजी आहे. आमदार विजय खडसे यांनी गेल्या पाच वर्षात उपजिल्हा रुग्णालय आणि बायपासचा प्रश्नही मार्गी न लावल्याने नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांना दीड हजार मतांचा आधार दिल्याने खडसे तिकीटाबाबत बिनधास्त आहेत. खडसे यांना पुन्हा संधी दिली गेल्यास पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. भाजपाचे राजेंद्र नजरधने गेल्या वेळी सात हजार २५५ मतांनी पराभूत झाले. गतवेळी भाजपाचे गंगाखेड येथील माजी आमदार विठ्ठलराव गायकवाड यांनी बंडखोरी केली. त्यांना सेनेच्या पाठबळावर नऊ हजार ६८९ मते मिळाली. ही बंडखोरी नजरधनेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या पराभवानंतरही नजरधने मतदारांच्या संपर्कात होते. त्यामुळे आमदार खडसे यांना आतापासूनच हूरहूर लागली आहे. महायुतीत उमरखेड मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटाच्या वाट्याला सुटावा यासाठी काँग्रेसच्या गोटातून नगरमार्गे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिग्रसच्या कंत्राटदाराला तयार केले जात आहे. महायुतीतून बंडखोरी झाली तरच यावेळी काँग्रेसला विजय शक्य आहे. अन्यथा विद्यमान आमदाराला मतदार व पक्षातील नाराजीचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. मनसे, कम्युनिस्टाकडूनही उमेदवार रिंगणात उतरविला जाणार आहे. भाजपा-राष्ट्रवादी-भाजपा असा प्रवास करून आलेले डॉ. विश्वनाथ विणकरे यावेळी राष्ट्रवादीतील गोतावळ्याच्या भरोश्यावर भाजपात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न चालविले आहे. परंतु नितीन गडकरींशी नजरधनेंची असलेली जवळीक लक्षात घेता विणकरेंची तिकिटासाठी कसोटी लागणार आहे. बिजोरा येथील मालमत्तेच्या संरक्षणासाठी भाजपामधील श्रेष्ठींना हा मतदारसंघ आपल्या ताब्यात हवा आहे. नजरधने त्या श्रेष्ठींचे निकटवर्तीय मानले जात आहे. त्यामुळेच गेल्या वेळी पराभूत होऊनही पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही भाजपातील नवे चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्न करून नजरधनेंपुढे आव्हान उभे करीत आहे. विजय खडसे यांनी उमरखेड शहराला निधी दिला नाही म्हणून शहरी मतदार आणि नगरपरिषदेचा त्यांच्यावर रोष आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच कोटी देण्याची अर्थ राज्यमंत्र्यांची घोषणा सध्या तरी हवेतील गोळीबार ठरल्याचे दिसत आहे. गेल्या दोन तीन वर्षात दाखल झालेल्या ६० अ‍ॅट्रॉसिटी हे खडसेंवरील नाराजीचे मूळ कारण ठरले आहे. त्यातच पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना खडसे क्षुल्लक कामासाठीही ‘मुलाला भेटा’ असा सल्ला देत असल्याने पक्षातच खडसे विरोधी वातावरण पहायला मिळत आहे. ४० टक्के आमदार विकास निधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शिफारसीने खर्च होईल, असे ठरले होते. मात्र खडसेंनी हा शब्द न पाळल्याने राष्ट्रवादी नाराज आहे. त्यातच खडसेंनी गेल्या काही वर्षात सातत्याने मुंबईची वाट धरल्याने स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची असलेली नाळ तुटली आहे.