शहरं
Join us  
Trending Stories
1
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
2
अश्विनी बिद्रे प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; युक्तिवाद काय झाला?
3
हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...
4
IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा
5
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
6
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
7
एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!
8
धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू
9
"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
10
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
11
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जन्मोत्सवाला पोस्ट करा सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश!
12
रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले
13
Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
14
"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
15
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
16
टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
17
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video
18
“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!
20
"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले

एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:42 IST

२०१३-१४ पर्यंत शिंदे कुटुंबाला हे झाड कशाचे आहे? याबाबत माहिती नव्हती, आज त्याच झाडामुळे शिंदे कुटुंब करोडपती बनले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला एका झाडाने एका रात्रीत करोडपती बनवले. केशव शिंदे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. केशव शिंदे यांच्या वडिलोपार्जित जमिनीत एक झाड आहे, ज्याचे महत्त्व शिंदे कुटुंबाला अनेक वर्षं माहीती नव्हते, त्याच झाडाचे मूल्य ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.

केशव शिंदे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या खुर्शी गावातील रहिवाशी आहेत. शिंदे यांच्या ७ एकरच्या वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. २०१३-१४ पर्यंत शिंदे कुटुंबाला हे झाड कशाचे आहे, याबाबत माहिती नव्हती. हे झाड कर्नाटकातून आलेल्या काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी हे झाड रक्तचंदन प्रजातीचे असल्याचे सांगितले. सुरुवातील शिंदे कुटुंबाने दुर्लक्ष केले. परंतु, या झाडाची किंमत कोट्यावधी असल्याचे समजताच संपूर्ण शिंदे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर रेल्वेने वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली. 

शिंदे कुटुंबाची न्यायालयात धावदरम्यान, शिंदे कुटुंबाने खासगी संस्थेमार्फत झाडाचे मूल्यांकन करून घेतले, ज्यात झाडाची किंमत ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही रक्कम देण्यास रेल्वे विभाग टाळाटाळ करत होते. अखेर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ कोटी रुपये जमा केले, त्यापैकी नागपूर खंडपीठाने बँकेतून ५० लाख रुपये काढण्याची परवानगी दिली. शिंदे यांना पूर्ण नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खंडपीठाने झाडाचे मूल्यांकन करण्याचे आदेशही दिले.

लवकरच शिंदे कुटुंबाला उर्वरित रक्कम मिळेलवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची जमीन संपादित करण्यात आली. मूल्यांकनानंतर शेतकऱ्याला उर्वरित रक्कम मिळेल. या याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.