लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी बस सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. मात्र, अलीकडच्या काळात काळी ठिकाणी एसटी बसेसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये म्हणून एसटी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना होणे गरजेेचे आहे. प्रत्यक्षात अनेक एसटी बसेसमध्ये आजही तशी सुरक्षा यंत्रणा नसल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.‘लाेकमत’ने शुक्रवारी यवतमाळ बसस्थानकावर आलेल्या काही बसेसमध्ये पाहणी केली असता अग्नीशमन यंत्रणा आतमध्ये नसल्याचे दिसून आले. या बसमध्ये प्रथमोपचार पेट्याही नव्हत्या. त्याठिकाणी वायफाय यंत्रणाही पाहायला मिळाली नाही. एसटी बसेस खिळखिळ्या अवस्थेत दृष्टीस पडल्या. एसटी प्रशासनाने समोरील अपघात टाळण्यासाठी अग्नीशमन यंत्र कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना आवश्यक आहे.
प्रथमोपचार पेट्याही गायबएसटी बसेसमध्ये कुठलाही अपघात घडल्यास अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपाययोजना म्हणून प्रथमाेपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. या पेट्या गत अनेक दिवसांपासून गायब आहेत. ज्या उद्देशाने या पेट्या लावल्या गेल्या त्यालाच आता मुठमाती देण्यात आली आहे.
आगारात कडेकोट सुरक्षायवतमाळ शहरातील आगारामध्ये कुठलाही व्यक्ती आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी चाैकीवरच दोन चाैकीदार कामयस्वरूपी ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी याठिकाणी घेतल्या जातात.
वायफाय सुविधा नावालाचएसटीमधून प्रवास करताना प्रवाशांना ऑनलाईन सुविधा मिळावी याकरिता एसटीने वायफायची व्यवस्था केली होती. तशी कीट एसटीमध्ये लावण्यात आली होती. काही दिवस वायफाय सेवा सुरू राहिली. यानंतर वायफाय कनेक्टीविटी थांबली. आतातर वायफाय सुविधा असल्याचे बोर्डही पाहायला मिळत नाही.
बसस्थानकाच्या आडोशाला स्मोकिंग झोनबसस्थानकावर विविध गाड्या उभ्या असतात. त्याच्या मागील बाजूला कोणीच नसल्याने बीडी, सिगारेट ओढण्यासाठी प्रवाशांनी व्यवस्था उभी केल्याचे चित्र पाहायला मिळते. गुटखा, खर्रा, तंबाखू अशा वस्तू याठिकाणी आडोशाला येऊन सेवन केल्या जातात.
एसटीची आतून दुरवस्था
बसमध्ये विविध समस्या पाहायला मिळतात. काही बसेसमध्ये सीट खिळखिळ्या झाल्या आहेत. काही ठिकाणी सीटच गायब आहे. सुरक्षा प्रवेशद्वार दोरीने बांधलेले आहे. पाणी गळते म्हणून वरून टप्पर ठोकलेले आहे, तर लायटिंगची व्यवस्था तुटलेली आहे.
बसस्थानक प्रशासनाचे स्पष्ट मतएसटी संदर्भात अग्नीशमन यंत्रणा आणि वायफाय सुविधा या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर आपले मत नोंदविले. यावेळी त्यांनी वायफाय यंत्रणा अनेक दिवसांपासून नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, प्रथमोपचारपेटी कंडक्टरकडे सोपविल्याचे ते म्हणाले.