लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात गोळा झालेल्या कचºयामधील प्लास्टिक वेगळे करून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग नगरपालिका हाती घेणार आहे. त्यासाठी सॅग्रिकेशन मशिनचा वापर केला जाणार आहे. हा प्रयोग राबविण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासन इंदूर आणि सांगलीचा दौरा करणार आहे.यवतमाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला गती देण्यासाठी १२ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री बसविण्यासाठी निधी दिला जाणार आहे.शहरात गोळा होणारा कचरा किती टन आहे, यावर त्या यंत्रांचे गणित विसंबून राहणार आहे. यासाठी मॅग्नेटिक सेप्रेटर आणि प्लास्टिक फ्लोअरची अद्ययावत यंत्रणा असणाºया मशनरीवर भर दिला जाणार आहे. यामुळे कचºयाचे विघटन करताना प्लास्टिक आणि लोखंड आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून वेगळे होईल. इंदूर आणि सांगलीमध्ये अशा मशनरी बसविण्यात आल्या आहे. त्यामुळे ह्या मशनरी बसविण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अधिकारी जाणार आहेत. त्यानंतर त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.यापूर्वी पालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी ८४ वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न बिकटसावरगड डेपोत घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत होते. या गावातील नागरिकांचा विरोध आहे. यासोबत खुल्या भागातही कचरा डेपोला विरोध आहे. यामुळे धामणगाव मार्गावरील जागा भाडेतत्वावर शोधण्यात आली आहे. पावसाळ्यात ही जागा अडचणीची ठरते. यामुळे नवीन जागेचा शोध घेतला जात आहे.
पालिका करणार प्लास्टिकपासून खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:19 PM
शहरात गोळा झालेल्या कचºयामधील प्लास्टिक वेगळे करून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग नगरपालिका हाती घेणार आहे. त्यासाठी सॅग्रिकेशन मशिनचा वापर केला जाणार आहे. हा प्रयोग राबविण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासन इंदूर आणि सांगलीचा दौरा करणार आहे.
ठळक मुद्देसॅग्रीकेशन मशीनचा प्रयोग : यवतमाळचे अधिकारी इंदूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर जाणार