शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

‘एसटी’त अनुकंपाची नियमबाह्य भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:41 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएक निलंबित : सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर महामंडळ खडबडून जागे झाले आहे.कर्तव्यावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ‘एसटी’त अनुकंपा तत्वावर सामावून घेतले जाते. सहानुभूती म्हणून नोकरी देताना महामंडळाने काही नियम टाकले आहे. याची अंमलबजावणी होत नाही. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कर्मचारी गट विमा, उपदान, भविष्य निर्वाह निधी, बचत ठेव आदी मार्गाने चार लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली असल्यास अनुकंपा नियुक्ती देता येत नाही. कुटुंबातील एकही व्यक्ती सेवेत नसावा, स्थावर मालमत्ता मर्यादेपेक्षा अधिक नसावी, अशा अटी ठेवल्या गेल्या आहेत.दिवंगत कर्मचाºयाच्या कुटुंबाला आज चार लाखांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त होते. स्थावर मालमत्ताही अधिक आहे. तरीही अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जात आहे. मात्र महामंडळाने या नियुक्तीची खैरात सुरू केली आहे. सर्व नियम पायदळी तुडवत सर्रास जागा भरल्या जात आहे. ही पदभरती काही अधिकाºयांसाठी अधिक उत्पन्नाचा स्रोतही बनली आहे. हा सर्व प्रकार लोकमतने वृत्तातून मांडला होता. याची दखल घेण्यात आली. यवतमाळ विभागात एक कामगार निलंबित तर दोघांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. कागदोपत्री पुरावे सापडल्याने उर्वरित दोघांवरही निलंबणाच्या कारवाईचे संकेत आहे. सुरक्षा व दक्षता विभागाने सखोल चौकशी सुरू केल्याने मोठे घबाड बाहेर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ