पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळी यांना जनावरांची एका वाहनातून तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून मेटीखेडा ते मोहदा मार्गावर सापळा रचला. गुरुवारी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम.एच.४०-ए.के.५७३१ या वाहनातून जनावरे जात असल्याचे दिसून आले. या वाहनाची तपासणी केली असता, ट्रकचा चालक व क्लिनर दोघेही ट्रक सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रकची तपासणी केली असता, त्यात तब्बल २० बैल आढळून आले. या जनावरांची किंमत तीन लाख रुपये एवढी आहे. ही जनावरे एकमेकांना आखूड दोरीने बांधून ठेवलेली होती. तसेच यातील ४ बैल बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. या जनावरांची किंमत तीन लाख असून ट्रकची किंमत १२ लाख आहे. पोलिसांनी असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक व क्लिनरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळी करीत आहे. या जनावरांची रवानगी आता गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे.
कत्तलीस जाणाऱ्या २० जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:45 AM