शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 10:48 PM

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.

ठळक मुद्दे३0 कामांचे भूमिपूजन : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानतर्फे विकास, सात कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश पेंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव इंगळे यांनी गावाच्या विकासासाठी एकता महत्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये विकास कामे करीत असून ३९ मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.आमदार नजरधने यांनी जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात विविध गावात अनेक कामे हाती घेण्यात आली असून शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे, असे सांगितले. या अभियानातून येथील तीन जिल्हा परिषद शाळा डीजिटल करण्यात आल्या. शुद्ध पाण्यासाठी आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. समाज मंदिर व शाळेची रंगरंगोटी केली. गावात अभ्यासिका तयार करून फर्निचर व पुस्तके खरेदी केली. बचत गट प्रशिक्षणासाठी साहित्य खरेदी केले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार व गावकऱ्यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आली. संचालन गजानन नरसलवाड, तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा आडे, रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे व गावकरी उपस्थित होते.