शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आदिवासी बोली भाषा जतन व संवर्धन केंद्राचे थाटात लोकार्पण

By admin | Published: August 11, 2016 1:06 AM

शिवणी पोड : देशातील पहिले केंद्र, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप ....

घाटंजी : राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिले आदिवासी बोली भाषा जतन आणि संवर्धन केंद्र शिवणी पोड येथे सुरू झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन जागतिक आदिवासी अस्मिता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, सरपंच दुर्गा राठोड, गटशिक्षणाधिकारी मनुताई पखाले, केंद्र प्रमुख काशीनाथ वाघाडे, कोलामी भाषा साहित्यिक शिक्षक पैकुजी आत्राम, विनोद आडे, कान्हुजी आत्राम, बजरंग आत्राम, प्रवीण मडावी, भाऊ पुसनाके, दादा चिकराम आदी उपस्थित होते. कोलाम समाजातील विद्यार्थ्यांना शिकविलेले कळत नाही, ही बाब प्रदीप जाधव या शिक्षकाच्या लक्षात आली. मग त्यांनी विद्यार्थ्यांकडून कोलामी भाषा शिकून घेतली. त्याचे हस्तलिखित पुस्तक तयार केले. याचा वापर करीत ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले. या प्रयोगातूनच आदिवासी बोली भाषा जतन व संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुचिता पाटेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. यावेळी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रवीण मडावी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. संचालन रूपेश कावलकर यांनी, तर आभार कुंडलिक आत्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)