शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

रिलायन्सच्या सीईओंसह सहा जणांवर गुन्हा; नुकसानग्रस्त शेतकरी सोडून शेतात पीक नसणाऱ्या शेतकऱ्याला मदत कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:10 PM

पीक विमा कंपनी: कृषी विभागातील सांख्यिकी अधिकाऱ्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात २०२३ मध्ये प्रचंड अतिवृष्टी होऊन ११० महसूल मंडळातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा कंपनीकडून मदत अपेक्षित असताना यामध्ये मोठी अफरातफर करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही, उलट ज्याच्या शेतात पीक नव्हते अशा शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आला. हा सर्व प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर सांख्यिकी विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात मे. रिलायन्स जनरल विमा कंपनी मुंबई याच्या सीईओंसह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीईओ राकेश जैन (४८), प्रमुख शासकीय व्यवसाय अधिकारी प्रकाश थॉमस (४०), उपाध्यक्ष शासकीय व्यवसाय रिजवान मोहम्मद कॅभवी (४८) जोखीम राज्य व्यवस्थापक विजय मोरे (४०) राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील (३८), जोखीम जिल्हा विमा योजना व्यवस्थापक स्वप्नील घुले (३५) अशी गुन्हा नोंद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यांच्यावर पीक नुकसानीच्या सर्व्हेक्षणात अनियमितता केली. तसेच शासन आणि प्रशासनाची फसवणूक करण्यात आली, असा ठपका ठेवला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्या पिकांच्या नुकसानीचे वेळेत सव्र्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता विमा कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरले. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावरून चौकशी सुरू झाली. यातून हे वास्तव पुढे आले. पीक विमा कंपनीने कृषी विभागाला चौकशी कोणतेच सहकार्य केले नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अतिशय कमी रक्कम टाकून एकप्रकारे त्यांची थट्टा केली. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी कृषी उपसंचालक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असता, त्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक आढळून आले नाही, तरी विमा कंपनीने काहींना पीक नुकसानीचा लाभ दिला. तर दुसरीकडे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काही शेतकऱ्यांना केवळ ७६८ रुपये इतकी मदत दिली. 

या सर्व गौडबंगालाची कृषी विभागाच्या सांख्यिकी शाखेने पडताळणी केली. त्यानंतर तंत्र अधिकारी प्रदीप वाहाने यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून या प्रकरणात कलम ४२०, ३४ भांदविनुसार संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीRelianceरिलायन्सfarmingशेतीYavatmalयवतमाळ