शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

By अविनाश साबापुरे | Published: November 18, 2023 2:48 PM

फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल

यवतमाळ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता कॅन्सर चाचणीचाही समावेश झाला आहे. तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या फाॅलोअप चाचण्याही या योजनेतून करणे शक्य होणार आहे. यवतमाळ येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीलाही पाठविण्यात आला आहे.

आतापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या पॅकेजमधील उपचाराचा खर्च रुग्ण डिस्चार्जपर्यंतच केला जायचा. मात्र, त्यानंतर आजाराच्या फॉलोअपसाठी काही महागड्या चाचण्या कराव्या लागल्या तर त्या रुग्णाला स्वखर्चातून कराव्या लागत असे. परंतु कॅन्सरच्या बाबतीत आता पॅकेजमधून खर्च करून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर फॉलोअपमध्ये काही चाचण्या कराव्या लागल्या तर त्याचा खर्च या योजनेमधून केला जाणार आहे.

कॅन्सरवरील उपचारानंतर फॉलोअपसाठी जेव्हा रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यावेळी त्यांना लिक्विड बायोप्सी, तसेच कॅन्सरशी संबंधित खर्चिक चाचण्या कराव्या लागायच्या. काही चाचण्या १५ ते २० हजारांच्या घरात खर्च येत असे. गेल्या काही वर्षांपासून तो फॉलोअप चाचण्यांचा करण्यात यावा, याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा होती. अखेर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अध्यक्षतेखाली काही कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणत्या फॉलोअप चाचण्या पॅकेजमधून करण्यात याव्यात, हे सुचविले. त्यानुसार, त्या चाचण्या लवकरच या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅन्सरचाच समावेश का?

योजनेत राज्यातील १,००० रुग्णालयांचा समावेश असून आजाराची संख्या ९९६ वरून १,३५६ इतकी केली आहे. या योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हा दुर्धर आजार असून या आजारचे उपचार घेऊन रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला नियमित फॉलोअपची गरज असते. त्या काळात त्याला आजार आटोक्यात आला आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये सीटी स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी, एमआरआय यासह आणखी कॅन्सर आजाराशी निगडित चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी लागणारा खर्च अधिक असतो. त्यामुळे या चाचण्या योजनेच्या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महागड्या कॅन्सर चाचण्या मोफत करून गरीब रुग्णांना दिलासा देण्यात यावा या संदर्भात मागील हिवाळी अधिवेशनात धरणे दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. यवतमाळातून कॅन्सरमुक्त भारत अभियान सुरू केले. त्याची दखल शासनाने घेतली आहे. या निर्णयामुळे राज्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- सतीश मुस्कंदे, संचालक, ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटर, यवतमाळ

टॅग्स :Healthआरोग्यYavatmalयवतमाळ