शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 10:54 PM

आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता शेतकऱ्यांची पडीक जमीन वाया जाणार नाही. कारण तुम्ही सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने देऊन वार्षिक ३० हजार रुपये कमवू शकता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असा शासनाचा विचार आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंप बसविला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना? महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

महागावात अद्याप लाभार्थी नाही- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसंदर्भात महागाव तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ आहे. या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने लाभ घेतला नाही. - शेती रस्त्याला लागून असणे आणि उपकेंद्र त्या ठिकाणापासून जवळ असणे गरजेचे आहे. या प्रमुख अटीमुळे अनेकांना सहभाग नोंदविता आला नाही.

किमान तीन एकरापासून ५० एकरापर्यंत- आपली पडीक जमीन सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी तीन एकरापासून ते ५० एकरांपर्यंत भाडेतत्त्वावर देता येईल, अशी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना तयार केलेली आहे. जमीन देणारे खासगी व्यक्ती अथवा संस्थांना वार्षिक भाडे देणार आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना