यवतमाळ : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जिल्हा परिषदस्तरावर प्रलंबित आहेत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे निवेदन देण्यात आले. यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर कारवाई झाली नसल्याचे प्रसंगी प्रामुख्याने नमुद करण्यात आले. जिल्हा परिषदेत कार्यरत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न लेखी स्वरुपात महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, प्रवीण गोबरे, किरण मानकर यांच्याकडे कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समस्यासंदर्भात या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन सरचिटणीस प्रकाश बागडे, महेंद्र कावळे, अरुणा बन्सोड, कृष्णा ढोल, शीतलकुमार वानखेडे, राजेंद्र वाघमारे, नामदेवराव थूल, देविदास मनवर, डी.जी. पाईकराव, घनश्याम पाटील, दिघाडे, दिलीप बरडे, नंदराज गुजर, सुहास परेकर, हेमंत शिंदे, डॉ. कांबळे, प्रवीण देवतळे, सहदेव चाहंदे, श्रीकांत मडावी, गिरीधर ढोक, निरंजय पवार, अशोक वावळे, नितीन कोल्हे, दिलीप ठाकरे, वनमाला राऊत आदींनी केले आहे. (वार्ताहर)
कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे ‘सीईओं’ना निवेदन
By admin | Published: August 27, 2016 12:50 AM