लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन सावित्रीआई महिला मंडळाच्या नेतृत्त्वात नगराध्यक्ष कांचन चौधरी यांना देण्यात आले. विविध महिला संघटनांच्या सदस्यांचीही यावेळी उपस्थिती होती. महिला महामानवांचा शहरात एकही पुतळा नाही. महिलांच्या प्रेरणास्थान असलेल्या पहिल्या श्ाििक्षका सावित्रीआई यांचा पुतळा उभारून ही उणीव भरून काढावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सावित्रीआई फुले महिला मंडळ, अखिल भारतीय माळी महिला महासंघ, सत्यशोधक विचार मंच, सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच, जागृती महिला मंडळ, स्वामिनी स्वयंसहायता बचत गट, प्रियदर्शिनी बचत गट, सत्यशोधक शिक्षक संघ, समता पर्व महिला समिती, तेजांकूर बहुद्देशीय संस्था, अस्तित्व फाऊंडेशन, जिजाऊ ब्रिगेड, विदर्भ तेली समाज महिला आघाडी, राणी दुर्गावती महिला मंडळ, भारतीय पिछडा शोषित संघ, सत्यशोधक गोलमेज परिषद, सत्यशोधक स्टडी सर्कल, कनक कांचन महिला मंडळ, राणी दुर्गावती महिला मंडळ, स्मृती पर्व महिला समिती आदी संघटनांचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबार्इंच्या पुतळ्यासाठी निवेदन
By admin | Published: July 03, 2017 2:04 AM