दिग्रस : डेहणी येथील गजानन रामराव इहरे याच्या शेतातील उभे पिक रानडुकराने नष्ट केले. शेत पिकाची झालेली भीषण अवस्था पाहून तो आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होता. ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तत्काळ दिग्रस येथे आणून इतर शेतकऱ्यांनी त्याचे समुपदेशन केले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी त्याच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन भरपाई मिळण्याची मागणी केली. त्यांच्या सोबत दोन तास सकारात्मक विचार मंगेश वानखडे, संजय राऊत, जगदीश नलगे, अशोक बोरकर, प्रमोद वारे,गजानन कुरकुले, सतीश गवळी यांनी त्यांच्या समोर मांडून आत्महत्या करणे हा पर्याय नसून याबाबत आपण शासनाकडे याचना करू शासन आपणास नक्कीच मदत करेल अशी आशा त्या शेतकऱ्याच्या मनात रुजविली व गुरुवारी तहसीलदार किशोर बागडे यांच्याकडे या बाबत सर्वांनी मिळून निवेदनन दिले. तहसीलद किशोर बागडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वनविभागाशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. निवेदन देतेवेळी गजानन इहरे यांच्यासह मंगेश वानखडे, संजय राऊत, रामराव इहरे, गजानन उंबरकर, सै. सलीम सै. सलाम, जगदीश नलगे, अशोक बोरकर,कुरकुले, प्रमोद वारे व ग्रामस्थ उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन
By admin | Published: September 15, 2016 1:27 AM