शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

राखीव वनात तस्करांचा धुमाकूळ

By admin | Published: May 30, 2016 12:08 AM

तालुक्यातील जंगलात दिवसाढवळ्या सागवानासह आडजात वृक्षांची कत्तल होत असून या प्रकाराकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे.

दिवसाढवळ्या सागवान कत्तल : पुसद वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पुसद : तालुक्यातील जंगलात दिवसाढवळ्या सागवानासह आडजात वृक्षांची कत्तल होत असून या प्रकाराकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे. परिणामी सागवान तस्करांचे चांगलेच फावत असून शहर व परिसरातील काही आरामिशनवर तस्करीतील सागवानाची खरेदी केली जात असल्याची माहिती आहे. या गोरख धंद्यांत अडकल्याची माहिती वन विभागाला असली तरी कारवाई मात्र केली जात नाही. पुसद तालुक्यात चारही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान आणि इतर मौल्यवान वृक्ष आहे. परंतु गत काही दिवसांपासून ही वनसंपदा धोक्यात आली आहे. तालुक्यातील तस्करांसह परप्रांतातील तस्करही थेट जंगलात शिरुन सागवानाची तोड करीत आहे. घनदाट जंगलात दिवसाढवळ्या सागवानाची तोड केली जाते. याला स्थानिकांचे पाठबळ मिळते. तोडलेले सागवान वाहनाद्वारे पद्धतशीरपणे बाहेर आणले जाते. त्याची विल्हेवाट लावण्यात येते. यात मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार माहीत असतो. परंतु आर्थिक हितसंबंधामुळे कारवाई केली जात नाही. काही आरा मिशनवर सागवानाची अवैध कटाई केली जात असल्याची माहिती आहे. आरामशीनची तपासणी केल्यास हा प्रकार उघडकीस येऊ शकतो.एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा म्हणत आहे. दोन कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात आहे. त्याच काळात पुसद तालुक्यात बहरलेले जंगल तोडले जात आहे. वृक्षतोड हा अनेकांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. काहीही न करता मोठ्या प्रमाणात यात पैसा मिळत असल्याने अनेक जण यात गुंतले आहे. तर काही ठिकाणी मालकी हक्काच्या सागवान तोडीसोबत जंगलातील सागवान तोडून त्यात मिसळले जाते. (तालुका प्रतिनिधी)