लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २०२५ पर्यंत महिला आरक्षणाची स्थिती काय असेल यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत ठेवण्यात आली होती. या सोडतीसाठी महिला नव्हे तर चक्क पुरुषच आले होते. यामुळे महिला आरक्षणावरच पुरुषांचे राजकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले.गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच महिला आणि इतर सर्व पुरुष पुढारी असे चित्र सभागृहात होते. विशेष म्हणजे आरक्षण जाहीर करताना कुठलेही नियोजन नसल्याची बाब यावेळी दिसून आली.महागाव तालुक्यातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर वीज गेली, त्याला पर्याय म्हणून ईन्व्हर्टरची व्यवस्था असणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तशी कुठलीच व्यवस्था सोडतीच्या ठिकाणी नव्हती. यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय आरक्षण जाहीर केले जात होते. याचा कुठलाही आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हता. अशाच स्थितीत चार तालुक्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण घोषित करताना प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. कुणालाही स्पष्टपणे ऐकायला येत नव्हते. जाहीर करणारे तहसीलदार अतिशय वेगाने गावांची नावे वाचून दाखवित होते. त्यात स्पीकर नसल्याने कुणाला गावांची नावे ऐकूच येत नव्हती. हा गोंधळ वाढल्याने गावकऱ्यांनी टेबल भोवती घोळका धरला होता. यातून स्थिती अधिकच बिकट झाली. या सर्व गोंधळात आरक्षण जाहीर होणारे तालुके पुढे जात होते. रात्री ८ पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. या सर्व स्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात होता.प्रवर्गनिहाय राखीव झालेल्या जागागुरुवारी अनुसूचित जातीच्या ६२ जागा महिला सरपंचासाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जमातीच्या ८५ जागा महिला सरपंच पदासाठी आरक्षित राहिल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १४१ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. सर्वसामान्य गटातील २३५ जागा महिला सरपंचासाठी आरक्षित राहिल्या.यासोबतच पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला आरक्षणही यावेळी जाहीर करण्यात आले.
आरक्षण महिलांचे, गर्दी पुरुषांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:00 AM
गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच महिला आणि इतर सर्व पुरुष पुढारी असे चित्र सभागृहात होते.
ठळक मुद्देजिल्हा कचेरीत उडाला गोंधळ : वीज गुल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाही