लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाऊस आणखी लांबल्यास जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना कोरडा गेला. जूनमध्ये पावसाने दगा दिला. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र कोरडे गेले. नंतरच्या आर्दाने थोडा दिलासा दिला. तथापि अद्यापही दमदार पाऊस झालाच नाही. परिणामी जलाशयातील पाणी कमी होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या धरणात केवळ ०.८ दलघमी पाणी शिल्लक आहे. यामुळे यवतमाळकरांना पाणी कपातीसह भविष्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण छोटे-मोठे १०७ जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५९३ दशलक्ष घनमिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा १९ टक्केच्या घरात आहे. अनेक लघु प्रकल्प भर पावसाळ्यात कोरडे पडले आहे. पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तर जेमतेम पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील २५० तलाव कोरडे पडले आहेत. अनेक प्रकल्पात नावालाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातून गाव शिवारात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील ५३४ गावांतील ७६ हजार १०४ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर दरदिवसाला ८७ फेºया मारत आहेत. पाणी भरण्यासाठी ५३४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. या ठिकाणावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष लक्षात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.यवतमाळ शहरावर पाण्याचे संकटयवतमाळातील तब्बल तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत आहे. निळोणा जलाशयात आजच्या घडीला केवळ १२.१२ टक्के, तर चापडोहमध्ये ३०.२९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा शिल्लक आहे.
जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:05 PM
पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे.
ठळक मुद्देनिळोणात १२ टक्केच पाणी : २५0 तलाव कोरडेच, तीव्र पाणीटंचाईचे संकेत