लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे पाणलोट विकास व उपचाराची भूमिका, यावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालयात हे प्रदर्शन १८ डिसेंबरला घेण्यात आले.या प्रदर्शनाला तालुक्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. गावाला पाणीदार करण्याचा संकल्प घेऊनच ग्रामस्थ बाहेर पडले. बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, गटविकास अधिकारी माणिक चव्हाण उपस्थित होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून पाणलोट विकासाची भूमिका ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी पाणलोट विकासाचे छोटे-छोटे मॉडेल्स येथे ठेवण्यात आले. श्रमदानासाठी गावाने एकत्र आल्यानंतर जलसंधारणाच्या स्पर्धांमधून बक्षीस कसे मिळविता येते, याचीही माहिती दिली.‘सत्यमेव जयते वॉटर कप ३’मध्ये तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपली गावे पाणीदार करावी, यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती मदत केली जाईल, असे तहसीलदार हामंद यांनी सांगितले. गटविकास अधिकारी माणिक चव्हाण, तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, संचालन नारायण भोयर यांनी केले. सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, आयसीडीएस ज्योती लुंगटे, फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, परमेश्वर जोगदंडे, शिवाजी बळी, रवींद्र लोखंडे, स्वप्नील वारेकर, हरी वाघमारे, एफईएस संस्थेचे संतोष पवार, सरपंच, सचिव, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रदर्शनाला जिल्हा परिषद सदस्य सरिता जाधव, पंचायत समिती सभापती कालिंदा आत्राम, उपसभापती नीता जाधव यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहण्यासाठी समर्थ महाविद्यालय, कन्या शाळा, पाणलोट जलमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घाटंजीवासीयांचा पाणीदार गावाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:30 PM
तालुक्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे पाणलोट विकास व उपचाराची भूमिका, यावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालयात हे प्रदर्शन १८ डिसेंबरला घेण्यात आले.
ठळक मुद्देपंचायत समितीत प्रदर्शन : पाणलोट उपाययोजनांची ग्रामस्थांना दिली माहिती