शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

नगरसेवकांना अंधारात ठेऊन घेतले लाखोंच्या कामाचे ठराव

By admin | Published: January 08, 2017 1:07 AM

स्थानिक नगरपंचायतीमधील सत्तारुढ शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंधारात ठेऊन लाखो रुपयाचे ठराव घेत आहे.

कळंब नगरपंचायत : सात नगरसेवकांची तक्रार, कारवाईकडे लक्ष कळंब : स्थानिक नगरपंचायतीमधील सत्तारुढ शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंधारात ठेऊन लाखो रुपयाचे ठराव घेत आहे. सर्वसाधारण सभेत चर्चा न करताही ठराव लिहिले जातात. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक राजू पड्डा यांच्यासह सात नगरसेवकांनी केली आहे. याविषयावरुन सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहे. नगरपंचायतीला रस्ता अनुदान योजनेसाठी २० लाख रुपये प्राप्त झाले. त्यानंतर १९ मे २०१६ रोजी नगरपंचायतची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेत सदर निधीतील रस्ते कुठे तयार करावे, याची कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. असे असले तरी, याच सभेत रस्ते कुठे तयार करावे, याचा ठराव परस्पर मंजुर करण्यात आला. हा सर्व नियमबाह्य प्रकार सत्तारुढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून केला आहे, असा आरोप नगरसेवक राजू पड्डा यांनी केला. विशेष म्हणजे केवळ तीन प्रभागातच २० लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये शिवसेना व भाजपाच्याच नगरसेवकांच्या प्रभागात ही कामे घेण्यात आली. इतर प्रभागांना मात्र डावलण्यात आले. सदर योजनेतील निधी वापरताना सर्व नगसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर ठराव रद्द करुन सर्वांना विश्वासात घेऊन पुन्हा ठराव घेतला जावा. तसेच सभेत चर्चा झालेल्या विषयाचेच ठराव घेण्यात यावे, अशी मागणी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर राजू पड्डा, फारुक सिध्दीकी, सुनंदा आसुटकर, वैशाली नवाडे, रिता वाघमारे, वैशाली मारोती वानखडे, शैलजा उमरतकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे तक्रारकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)